आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सपाेझ:रक्षकांचीच घरे असुरक्षित; नाशिकरोडला पोलिस वसाहतीतील ८० घरांची दुरवस्था

नाशिक रोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डोळ्यात तेल घालून बारा तास कर्तव्य बजावत शहरवासीयांच्या सुरक्षितततेची जबाबदारी पेलणाऱ्या पाेलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे वास्तव्यच धाेक्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकराेड पाेलिस कर्मचारी वसाहतीत दिसून आला. नाशिकराेड पाेलिस ठाण्याला लागून असलेल्या १५० कर्मचाऱ्यांची निवासस्थानांची दुरवस्था बघून या ठिकाणी हे कुटुंबीय कसे राहू शकतात? असा प्रश्न पडताे. या ठिकाणी गुडघाभर वाढलेले गाजरगवत असून पावलाेपावली सापांचा वावर आहे. भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुलांसह महिलांना स्वत:चा बचाव करावा लागत असल्याचे चित्र आहे.

दिव्य मराठीच्या प्रस्तुत प्रतिनिधीने नाशिकराेड पोलिस वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला असता अनेक धक्कादायक बाबी समाेर आल्या आहेत. या वसाहतीत १५० निवासस्थाने असून त्यातील ८५ घरांची दुरावस्था झाली आहे. सद्यस्थितीत ६० घरांमध्ये कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय राहतात. या घरांसह इतर घरांमधील भितींचीही पडझड झाली असून पावसाळ्यात काैलांची गळती हाेत आहे.

पाेलिस कल्याण कागदावरच का?
या वसाहतीची दुरवस्था बघून पाेलिस कल्याणासाठी असणाऱ्या काेट्यवधींचा निधी नेमका जाताे कुठे? शहरात माेठ्या गृहनिर्माण साेसायट्या बांधल्या जात आहेत, मात्र, नाशिकराेडच्या या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्याच नशिबी अशी दुरवस्था का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. पाेलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी किरकाेळ पडझड झाल्यास लागलीच पाठपुरावा करून सार्वजिनक बांधकाम विभाागकडून कामे हाती घेतली जातात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असे केले जात नसल्याने हा दुजाभाव का? असा प्रश्न विचारला जात आहे.

गवतात सापांचा वावर
या पाेलिस वसाहतीमध्ये गाजरगवत वाढले असून जागाेजागी पाणी साचून डबके तयार झाले आहे. या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती हाेत आहे. याच ठिकाणी सापांची संख्या माेठ्या प्रमाणात आहे. या परिसरात पाेलिस कर्मचाऱ्यांची लहान मुले खेळत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याने उपाययाेजना करण्याची गरज आहे.

बातम्या आणखी आहेत...