आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिव्हिल:सिव्हिलमधील ओपीडीची वेळ आता स. 9 ते दु. 3

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. बुधवार (दि. २) पासून बाह्यरुग्ण विभाग सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत सुरू राहणार आहे. या वेळेमुळे ग्रामीण आणि शहरातील नागरिकांची गैरसोय टळणार आहे.

पूूर्वीची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ अशी होती. आता जेवणाची वेळ कमी केल्याने सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत बाह्यरुग्ण विभागात डाॅक्टर उपलब्ध राहणार आहेत. ग्रामीण भागातील बहुतांशी रुग्ण सकाळी रुग्णालयात येतात. या रुग्णांना आता वेळेत तपासणी करून आपल्या घरी जाता येणार आहे. शहर व परिसरातील नागरिकांना आता वेळेत उपचार मिळणार आहे.

मेडिकल काॅलेज प्रशासनाचे डीन यांनी या वेळेत बदल केला आहे. या आधीची बाह्यरुग्ण विभागाची वेळ गैरसोयीची असल्याची तक्रार हाेती. पूर्वीच्या वेळेत सकाळी डाॅक्टर उपलब्ध होत असत. दुपारी डाॅक्टर नसल्याने रुग्णांची हेळसांड होत होती. ग्रामीण भागातील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात मुक्काम करावा लागत होता. नवीन वेळेमुळे रुग्णांची गैरसोय टळणार की आणखी वाढणार हे बघणे महत्त्वाचे आहे.

बातम्या आणखी आहेत...