आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:मुक्त विद्यापीठातील प्रवेश 15 नोव्हेंबरपर्यंत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी सुरू असलेल्या प्रवेशप्रक्रियेस १५ दिवसांनी मुदतवाढ दिली आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. २० नोव्हेंबरपर्यंत त्यांना संबंधित अभ्यास केंद्राची मान्यताही घ्यावी लागणार असल्याची माहिती कुलसचिव डाॅ. प्रकाश देशमुख यांनी दिली आहे. मुक्त विद्यापीठाने यंदा जुलैपासूनच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात केली होती.

परंतु, कोरोनाचे संकट नष्ट झाल्याने आणि शेवटच्या टप्प्यामुळे महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष लेखी परीक्षा झाल्या. त्यास विलंब झाला होता. त्यानंतर पुन्हा निकालासही विलंब झाल्याने प्रक्रिया सुरू होऊनही सुरुवातीच्या टप्प्यात विद्यार्थ्यांकडून प्रवेशाला प्रतिसाद मिळालाच नाही. त्यामुळे वेळोवेळी त्यात मुदतवाढ देण्यात आली. ३१ आॅगस्टची प्रक्रिया नंतर १५ सप्टेंबर आणि त्यापुढे ३१ आॅक्टोबरपर्यंत वाढविण्यात आले. परिणामी विद्यार्थ्यांचे प्रवेशही झाले. सद्यस्थितीत साडेचार लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असले तरीही विद्यापीठाची नियमित प्रवेशाची संख्या ही सात लाख आहे. त्यामुळे यंदा कमीत कमी पाच लाख प्रवेश व्हावे यासाठी विद्यापीठाने प्रक्रियेस १५ दिवसांनी मुदतवाढ दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...