आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदक:24 व्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत मुक्त विद्यापीठाला दोन रौप्य

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित २४ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उंच उडी व लांब उडी प्रकारात दोन रौप्य पदके पटकावली. उंच उडी प्रकारात धैर्यशील गायकवाड तर लांब उडी प्रकारात नीलेश आवळे या विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावले. मैदानी खेळासाठी दिलीप भंडारे आणि मधुकर खैरनार, तर संघ व्यवस्थापक म्हणून राजेंद्र मांडगे व प्रदीप गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. कुलगुरू प्रा. डॉ. पी.जी. पाटील, कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख, डॉ. विजया पाटील यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...