आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता:मुक्त विद्यापीठाचे कनिष्ठ कॉलेज केंद्र आता होणार बंद

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पदवी आणि पदव्युत्तरचे सर्वच अभ्यास केंद्र हे वरिष्ठ महाविद्यालयांमध्येच सुरू असावेत, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ते सुरू करण्यास कुठलीही परवानगी देऊ नये, असे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्यानंतर आता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू असलेले सर्वच अभ्यास केंद्र आता बंद करावे लागणार आहेत. त्याची प्रक्रियाही विद्यापीठाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

विद्यार्थी गुणवत्तेसाठी आणि दर्जेदार शिक्षणासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने अर्थात यूजीसीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र हे वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यात यावे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ते सुरू करता येणार नाही. त्यामुळे अशी सर्व केंद्र त्वरित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्थलांतरित करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यापीठाने नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयामध्ये सुरू असलेले ग्रंथालय (B.Lib) अभ्यासक्रमाचे केंद्र बंद केले आहे. महाराष्ट्रभरात विद्यापीठाचे जवळपास ३ हजार पेक्षा अधिक अभ्यास केंद्र आहेत. यातील अनेक केंद्र ही कनिष्ठ महाविद्यालयांमध्येच देण्यात आली आहे. यूजीसीच्या आदेशानुसार आता ही सर्व केंद्र बंद करावी लागणार आहे.

संगणक अभ्यासक्रमही येणार अडचणीत एकीकडे यूजीसी ने कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्र बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या बाजूने मुक्त विद्यापीठाने कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तर केंद्र दिली होती पण संगणक अभ्यासक्रम हे खाजगी संगणक संस्थांमध्ये सुरू आहेत. त्यामुळे आता या अभ्यासक्रमांवरही संक्रांत येणारा असून येथील विद्यार्थ्यांचे भवितव्याचा प्रश्न वाचून उभा राहिल.

बातम्या आणखी आहेत...