आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्त विद्यापीठाचे ‘विशाखा काव्य पुरस्कार’ जाहीर:2019, 2020 चे पुरस्कार एकत्रित देणार; नवोदितांच्या पहिल्या काव्यसंग्रहाचा सन्मान

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचे आणि नवाेदितांना प्राेत्साहन ठरणारे महत्त्वाचे असे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक डाॅ. प्रवीण घाेडेस्वार यांनी दिली.

काेविड काळामुळे सन 2019 आणि 2020 मध्ये हे पुरस्कार देण्यात आले नव्हते. आता यावेळी दाेन्ही वर्षांचे पुरस्कार जाहीर केले आहेत.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने नवोदित कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहाला ‘विशाखा काव्य पुरस्कार’ देण्यात येतो. या पुरस्कारासाठी नवोदित कवींकडून त्या वर्षात (1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 आणि 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020) प्रकाशित झालेले कविता संग्रह मागविण्यात आले होते. निर्धारित मुदतीत प्राप्त झालेले कवितासंग्रह प्राथमिक निवड समितीकडे पाठविण्यात आले. त्यांनी निवडलेल्या कवितासंग्रहांचे परीक्षण अंतिम निवड समितीने केले.

अंतिम निवड समितीमध्ये डॉ. दिलीप धोंडगे, नाशिक, प्रा. प्रतिभा विश्वास, मुंबई, प्रा. माधव राजगुरू, पुणे, डॉ. रामचंद्र काळुंखे, औरंगाबाद, प्रफुल्ल शिलेदार, नागपूर यांचा समावेश होता. या निवड समितीची बैठक नुकतीच विद्यापीठात संपन्न झाली. त्यानुसार कवींच्या कवितासंग्रहांची विशाखा काव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्त कवींचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख आणि कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक प्राध्यापक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी अभिनंदन केले असल्याची माहिती कुसुमाग्रज अध्यासनाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी दिली.

यांना मिळाले पुरस्कार

वर्ष 2019

प्रथम क्रमांक

- निष्पर्ण फांदीवरचे पक्षी, तन्वी अमित

द्वितीय क्रमांक

- मातीत हरवल्या कविता, संतोष आळंजकर

तृतीय क्रमांक

- नाही फिरलो माघारी, मोहन शिरसाट

वर्ष 2020

प्रथम क्रमांक (विभागून)

- तुमुल अंतरीचे, विशाखा विशाखा

- असो आता चाड, संदीप शिवाजीराव जगदाळे

द्वितीय क्रमांक (विभागून)

- नामुष्कीचे पिढीजात वर्तमान, विनायक पवार

- टाहोरा ,अनिल साबळे

तृतीय क्रमांक

- दिवस बोलू देत नाही, गजानन फुसे

बातम्या आणखी आहेत...