आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च २०२३ या महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावी परीक्षेत कला व वाणिज्य या दोन्ही शाखांच्या तुलनेत यंदा नाशिक विभागाचा विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९६.८४ टक्के निकाल जाहीर झाला आहे.
महत्वाचे म्हणजे, यातही विद्यार्थ्यांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त आहे. विज्ञान शाखेत ९६. ३३ टक्के मुलांचा तर मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.५३ इतकी आहे. नाशिक विभागात १४ हजार ४२९ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणीचे यश मिळवले. यात सर्वाधिक ६ हजार २३ विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील आहेत. तर २१ हजार २९७ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि २९ हजार २९७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी पटकावली. बारावीनंतर तंत्रशिक्षणातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी उपलब्ध असते. यात सर्वाधिक विद्यार्थी इंजिनिअरिंग व बी. फार्मसी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असतात. नाशिक जिल्ह्यात या दोन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून दहा हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील सर्वाधिक ६ हजार विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी
नाशिक बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष आता इंजिनिअरिंग (बी. ई), फार्मसी (बी. फार्म), डिप्लोमा इन फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर यासह बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेकडे लागले आहे. जिल्ह्यात इंजिनिअरिंग, फार्मसीच्या १० हजार जागांवर प्रवेशासाठी संधी उपलब्ध हाेईल. पारंपरिक विद्याशाखांच्या तुलनेत कौशल्य मिळवून देणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त असतो. त्यामुळे पारंपारिक महाविद्यालयांच्या तुलनेत तंत्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची संख्याही मोठ्या संख्येने वाढली आहेत.
नाशिकमध्ये इंजिनिअरिंग पदवी शाखेची १९ महाविद्यालयांत ७ हजार ५३० जागा उपलब्ध आहेत. तर औषधनिर्माणशास्त्र या पदवीच्या २५ महाविद्यालयांत २ हजार ३७ जागा आहेत. हॉटेल मँनेजमेंट, आर्किटेक्चरच्या एकूण ४ महाविद्यालयांत २६० जागा यंदा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. नाशिक जिल्ह्यात इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, डी. फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची संख्या मोठी आहे.
कला, वाणिज्य, विज्ञान व संयुक्त शाखा या सर्व शाखांचा मिळून एकूण निकाल ९१.६६ टक्के जाहीर झाला आहे. विज्ञान शाखेपाठोपाठ वाणिज्य शाखेचा निकाल ९४ टक्के तर कला शाखेचा निकाल सर्वाधत कमी ८४ टक्के लागला आहे. संयुक्त शाखेचा निकाल ८५.९६ टक्के निकाल आहे. बारावीची परीक्षा एकूण १५४ विषयांसाठी घेण्यात आली. त्यापैकी २३ विषयांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी शिक्षण मंडळातर्फे जुलै व ऑगस्ट महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे.
या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा जुलै-ऑगस्ट २०२३ या महिन्यात होणार आहे. श्रेणीसुधार करण्यासाठी विद्यार्थ्यांना २९ मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येतील.मंडळाने नियमित वेळेतच निकाल जाहीर करत विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला आहे. निकालाचे अंतिम काम यंदा जवळपास १० दिवस अगाेदरच झाले.जिल्ह्यातील काॅलेज व कंसात प्रवेशाच्या उपलब्ध जागा
याप्रमाणे एकूण ७९ महाविद्यालयांत ११७८० उपलब्ध जागा आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.