आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Opportunity For Degree Plus In Graduate Education; 350 Online Courses Available, An Initiative Of Pune University To Make Students Industry Ready| Marathi News

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पदवी शिक्षणात डिग्री प्लस ची संधी; ३५० ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध,विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी बनविण्यासाठी पुणे विद्यापीठाचा उपक्रम

गणेश डेमसे | नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी. ए. बी. कॉम, बी.एस्सी..या पारंपरिक पदवी शिक्षणानंतर अनेकदा रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. व्यावसायिक काैशल्यांअभावी पुढील संधी मर्यादित राहतात. या पार्श्वभूमीवर पदवी शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेड बनविण्यासाठी, त्यांच्यामध्ये विविध काैशल्याचे शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिग्री प्लस हा उपक्रम सुरू केला आहे. मागील वर्षी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमात यंदाच्या वर्षी जागतिक पातळीवरील नामवंत अशा आयबीएम, स्टॅनफोर्ड, हार्वर्ड या संस्थांच्या वतीने क्लाउड काॅम्प्युटिंग, आयटी, आर्टिफिशयल इंटेलिजन्स यांसह विविध ३५० अभ्यासक्रम आॅनलाइन पद्धतीने सुरू केले आहेत. यातील काही अभ्यासक्रम निःशुल्क असून विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाबरोबर आता वेगवेगळी व्यावसायिक काैशल्ये प्राप्त करता येईल.

अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना इंडस्ट्री रेडी बनविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या डिग्री प्लस उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या नेतृत्वाखाली या डिग्री प्लस उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. हे सर्व अभ्यासक्रम ऑनलाइन असून यातील काही अभ्यासक्रम निःशुल्क आहेत. तर काही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मूळ शुल्कापेक्षा कमी दरात उपलब्ध करून दिले आहेत.

२०२२-२३ या वर्षाचे अभ्यासक्रमाचे वेळापत्रकही संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या उपक्रमात जवळपास २६ हजार विद्यार्थ्यांनी यासाठी नावनोंदणी केली होती. त्यातील पाच हजार विद्यार्थ्यांनी यासाठी प्रवेश घेतला होता.

या अभ्यासक्रमासाठी http://degreeplus.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील पदवी करत असलेले सर्व विद्यार्थी नोंदणी करू शकतील. हे अभ्यासक्रम वर्षभर सुरू असतात. याचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

नामांकित संस्थांशी करार
जागतिक दर्जाच्या संस्थांसोबत करार करत हे अभ्यासक्रम विद्यापीठात उपलब्ध केल्या आहेत. यात हार्वर्ड बिझनेस ऑनलाइन, एडब्ल्यूएस, सिंपली लर्न, सेलिब्रिटी स्कूल तर ईडीएक्स यांच्याशी झालेल्या कराराच्या माध्यमातून आयबीएम, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी सारख्या अनेक नामांकित कंपन्यांच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

अद्ययावत ज्ञान उपलब्ध
“डिग्री प्लस’च्या माध्यमातून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड काॅम्प्युटिंग, अर्थशास्त्र, संस्कृती आदी विषयातील अद्ययावत ज्ञान घेणे शक्य होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा. - डॉ. कारभारी काळे, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध
डिग्री प्लसच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्यातले बहुदा एकमेव सार्वजनिक विद्यापीठ आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा तसेच महाविद्यालयांनी देखील याबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे. - डॉ. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

बातम्या आणखी आहेत...