आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससीच्या परीक्षार्थींना दिलासा:राज्यसेवेच्या परीक्षेसाठी आता 24 जूनपर्यंत अर्जाची संधी

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य शासनाच्या विविध विभागातंर्गत वेगवेगळ्या संवर्गातील एकूण 161 पदांची भरती होणार आहे. येत्या 21 ऑगस्ट 2022 ला राज्य सेवेची पूर्व परीक्षा होणार आहे. राज्यातील 36 जिल्हा केंद्रांवर पूर्व परीक्षा होणार असून या भरती प्रक्रियेत सर्वाधिक जागा नगरपालिका, नगरपरिषदांमधील मुख्याधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी पदांच्या आहेत. या परीक्षेच्या नोंदणीसाठी 1 जून 2022 ही अंतिम मुदत होती.

या विहित मुदतीत वाढ करण्याचा निर्णय आयोगातर्फे घेण्यात आला असून इच्छूक विद्यार्थ्यांना आता 24 जूनपर्यंत अर्जासाठी संधी असेल. राज्य लोकसेवा आयोगातर्फे नुकताच राज्य सेवा परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली. या अंतर्गत विविध संवर्गातील 161 पदांची भरती होणार असून या जागांमध्ये वाढ होण्याचीही शक्यता आहे. सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट- अ (9), मुख्याधिकारी, नगरपालिका, परिषदा, गट- अ (22), बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट-अ व तत्सम पदे (28), सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (2), उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (3), कक्ष अधिकारी, गट-ब (5), सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब (4) यांसह निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे (88) या पदांसाठी भरती होणार आहे.

परीक्षार्थींना दिलासा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये (युपीएससी) खुल्या प्रवर्गासाठी सहा संधी, ओबीसी प्रवर्गासाठी 9 संधी, एससी, एसटी व दिव्यांगासाठी अमर्याद संधी असतात. युपीएससीप्रमाणेच एमपीएससीच्या परीक्षार्थींसाठी असलेल्या मर्यादित संधींचा निर्णय रद्द करत राज्य लोकसेवा आयोगाने आता सर्व प्रवर्गातील परीक्षार्थींना वयोमर्यादेच्या आत अमर्यादित संधी देण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...