आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक येथील जिल्हा ग्राहक आयाेगाने सटाणा येथील दिपक भामरे या ग्राहकाला 16 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला देत माेठा दणका दिला आहे. वाहनाचा अपघात झाल्यानंतर विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीला हा दणका देतांनाच संबंधित ग्राहकाला भरपाइचे आदेश दिल्यापासून संबंधित रक्कम हाती पडेपर्यंत 8 टक्के व्याज देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तक्रादार भामरे यांच्या मालकीचा ट्रक 10 जुलै 2017 राेजी कन्नड घाटात अपघात हाेऊन खाेल दरीत कोसळला होता. भामरे यांनी त्याची सुचना पोलीस स्टेशन व विमा कंपनीला दिली. मात्र विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपनीने वेगवेगळी कारणे दिली हाेती, सर्व्ह करण्यास उशीर केला, दाेनदा सर्वेअर नेमूनही नगण्य भरपाई देण्याचे कबुल केले. मात्र तीही प्रत्यक्षात दिली नाही. अखेर या ग्राहकाने जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल करत भरपाइ व व्याजाची मागणी केली. त्यावर विमा कंपनीने हजर होऊन तक्रारदाराने ट्रक दरीत काेसळल्यानंतर सुरक्षा रक्षक नेमला नाही, त्यामुळे ट्रकचे भाग चाेरीस गेल्याचा बचाव करत भरपाइ देण्याचे नाकारले, यावर जिल्हा ग्राहक अायाेगाने विमा कंपनीने वाहनाचे संपुर्ण नुकसान झालेला असतांनाही साेयिस्कर अटी-शर्ती पुढे करत कॅशलाॅस तत्वावर रक्कम मंजूर करण्याचा तसेच सेवेत कसुर केल्याचा ठपका ठेवला. विशेष म्हणजे, प्रकरणात दाेनदा सर्वेअर नेमण्यात येऊन दाेघांनीही टाेटल लाॅस मंजूर करण्याचा अहवाल दिला तरीही विमा कंपनीने रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसत असल्याचा निष्कर्ष काढल्याचे निकाल पत्रातून स्पष्ट हाेते.
2018 पासून व्याजही देण्याचे आदेश
आयोगाने या प्रकरणात निकाल देताना तक्रारदाराला 16 लाख रूपये देण्याचे तसेच उशीराबद्दल 2018 पासुन ८ टक्के दराने व्याज तसेच त्रासापाेटी 15 हजार रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारदाराच्या वतीने अॅड. सिध्दार्थ वर्मा यांनी कामकाज बघितले. त्यांच्या युक्तीवादावर, दाखल केलेल्या कागदपत्रांवर सहमत हाेत आयाेगाने हा निकाल दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.