आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये शहरातील अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटवण्यावर आलेले निर्बंध उठल्यानंतरही महापालिकेचा अतिक्रमण विभाग ढिम्म असल्यामुळे जिल्हा न्यायालयातील कोर्ट कमिशनने एका अनाधिकृत इमारतीवर कारवाई होत नसल्याच्या मुद्द्यावरून थेट पालिका आयुक्तांना ६ मे रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे फर्मान सोडले.
दरम्यान, ही बाब लक्षात घेत आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी सबुरीने तत्काळ हालचाली करत पोलिसांची मदत घेत पंचवटीच्या गणेशवाडीतील शेरे मळा भागातील दोन मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त केली.
न्यायालयाकडून फटकारणी झाल्यास महापालिकेची बदनामी होण्याची भीती लक्षात घेत पवार यांनी मोहीम फत्ते करतानाच यापुढे अतिक्रमण विभागात अशा पद्धतीची दिरंगाई चालणार नाही असाही संदेश दिला. नवे आयुक्त आलेल्या पवार यांनी नाशिकचे सौंदर्य जपण्यासाठी अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.