आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई महामार्गावर इगतपुरीजवळ वाहनांच्या भीषण अपघातात धुळे येथील युवक मनीष सनेर यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांस नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता ताे मेंदू मृत अवस्थेकडे जात असतानाच अल्प प्रतिसाद मिळत असल्याने त्याच्या कुटूंबियाना विश्वासात घेवून माहिती दिली. त्यानंतर त्यांना अवयवदानाचे महत्व सांगून समुपदेशन केले.
त्यानंतर मनीष यांना सुयश हाॅस्पीटलमधून अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्यानंतर ब्रेन डेथ समितीतील डॉक्टरांनी त्याला मेंदू मृत (ब्रेनडेड) घोषित केले. विशेष म्हणजे, अपघाताच्या चार दिवस आधीच मनीषने अवयवदान करण्यासाठी फॉर्म भरला होता आणि त्याचे डोनर कार्ड हे त्याच्या घरी कुरिअरने आले होते, त्यामुळे मनीषच्या आई-वडिलांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दाेन किडनी, डाेळे प्रत्याराेपण करण्यात आले. किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मोहन पटेल म्हणाले की, अवयव दानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे, वयाच्या 31 व्या वर्षी मनीषची अवयव दानाची इच्छा होती आणि दुर्दैवाने त्याचा अपघात झाला आणि तो मेंदू मृत अवस्थेत होता, त्याच्या कुटूंबियांनी देखील अवयव दानाची सहमती दिल्याने त्यांनी खूप मोठे काम केले आहे. त्याच्या निधनांतरही ताे त्याच्या अवयवदानातून ताे तिघांच्या रूपात कायम स्मरणात राहणार आहे. हॉस्पिटलचे युनिट हेड अजित झा म्हणाले, अवयव दान केल्याने ९ रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे.
सुयश हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत पाटील आणि डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी माेलाची भूमिका पार पाडली. संपूर्ण प्रक्रियेत आयसीयू विभागाचे डॉ. अतुल सांगळे, डॉ. अमोल खोळमकर,डॉ. प्रविण ताजने, डॉ.जितेंद्र शुक्ल, डाॅ. शीतल गुप्ता आणि डॉ. चेतन भंडारे डॉ. प्रवीण गोवर्धने , डॉ. किशोर वाणी , हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. अभयसिंग वालिया आणि अवयव प्रत्यारोपण समन्वयक चारुशीला जाधव यांनी अथक परिश्रम घेतल्याने प्रक्रिया सुखरूपपणे पार पाडली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.