आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेच्या विद्यमाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय दाेन दिवसीय अधिवेशनाचे आयाेजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये सुमारे एक दशकाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या दी फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन या संस्थेमार्फत आणि नाशिक येथील मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन आणि मराठा विद्या प्रसारक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने 18 आणि 19 फेब्रुवारी राेजी हे अधिवेशन होणार आहे. नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान या क्षेत्रातील कार्यरत संस्था आणि कार्यकर्ते यांना येथे नामवंत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी निमंत्रण
या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे समारोप समारंभासाठी भारत सरकारच्या स्वास्थ्य व परिवार कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
नामवंत तज्ज्ञ करणार मार्गदर्शन
कोरोना महामारीच्या कालावधीनंतर आता जनजीवन सुरळीत झाले आहे. तरीही या पार्श्वभूमीवर नेत्रदान, त्वचादान, देहदान, अवयवदान या सर्व श्रेष्ठदानाबाबतच्या सामाजिक जाणिवा अधिक बळकट होण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील सर्व श्रेष्ठदान क्षेत्रातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून त्यांच्या कार्यामध्ये पुन्हा नवीन उत्साह निर्माण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांच्या अडचणींबाबत चर्चा करणे आणि त्या अडचणी योग्य त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न या अधिवेशनातून हाेणार असल्याची माहीती मुंबई या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार व श्रेष्ठदान महाअभियान' अधिवेशनाचे निमंत्रक आणि मृत्युंजय ऑर्गन फाउंडेशन या नाशिक येथील संस्थेचे संचालक डॉ. भाऊसाहेब मोरे यांनी दिली.
भारत सरकारच्या स्वास्थ मंत्रालयाच्या नोटो या संस्थेची विभागीय संस्था 'रोटोसोटो मुंबई' महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक' इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य , रोटरी , लायन्स आणि सक्षम या स्वयंसेवी संस्था या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत आहेत. ज्यांना यात प्रतिनिधी म्हणून नाव नोंदणी करावयाची आहे. त्यांनी या ई-मेल वर संदेश पाठवावा. organdonationfed@gmail.com असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.