आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयाेजन:वंजारी महासंघातर्फे 25 डिसेंबरला मराठी साहित्य संमेलनाचे आयाेजन

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंजारी महासंघातर्फे पहिले मराठी साहित्य संमेलन २५ डिसेंबर राेजी नाशिकमध्ये हाेत आहे. गंगापूरराेडवरील रावसाहेब थाेरात सभागृहात सकाळी ९ वाजता संमेलनाला प्रारंभ हाेईल. खान्देशसह राज्यभरातील साहित्यिक या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून एरंडाेल येथील कवी, गझलकार प्रा. वा. ना. आंधळे यांची निवड करण्यात आली आहे.

मार्गदर्शक म्हणून कादंबरीकार बाबाराव मुसळे यांची उपस्थिती असेल. महंत तुळशीराम गुट्टे, वंजारी महासंघाचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष व लेखक गणेश खाडे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून प्रशांत आंधळे हे परिश्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...