आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेश-विदेशातील दुर्मिळ नाणी, नाेटा अन् वस्तुंचा अनमाेल खजाना शुक्रवारपासून नाशिककरांसाठी खुला हाेत आहे. कलेक्टर्स साेसायटी ऑफ न्युमिसमॅटीक एण्ड रेअर आयटेमस्कडून ‘रेअर फेअर’चे आयाेजन करण्यात आलेले आहे.
यात पेशवे, इंदाेरचे हाेळकर, बडाेद्याचे गायकवाड, उदयपुरच्या महाराणा प्रताप चाैहाण, बिकानेर जयपुर, हैद्राबाद, अहमदनगरच्या निजामा तसेच कच्छ राज्य, जाबरा, टाॅक देवास, टिपु सुलतान, त्रावणकाेर यांसारख्या अनेक संस्थानांची नाणी या खास आकर्षण ठरणार आहे. शुक्रवार 6 ते रविवार 8 जानेवारीपर्यंत तीन दिवसीय रेअर फेअर हे प्रदर्शन इंदिरानगर बाेगद्याजवळील मनाेहर गार्डन येथे हाेत आहे. दरराेज सकाळी 10.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू असेल.
पाेस्ट तिकिटे, दुर्मिळ वस्तु
यात, राष्ट्रीय स्तरावरील देशी व विदेशी दुर्मिळ नाेटा, नाणी, पाेस्ट तिकिटे, दुर्मिळ वस्तु, शिवकालीन शस्त्रात्रे यांचा समावेश या प्रदर्शनात असेल. या प्रकारच्या वस्तुंची खरेदी विक्री करणाऱ्या नाेंदणीकृत व मान्यताप्राप्त व्यापारी, पुरातत्व विभाग व भारत सरकार यांच्याकडून परवानाप्राप्त लिलाव कंपन्या, पाेस्ट, भारतीय रिझर्व्ह बॅंक यांची करेन्सी चेस्ट, मुंबई टांकसाळ यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यामुळे नागरीकांचा त्यांचा संग्रह वाढविण्यासाठी सहाय्य हाेणार आहे. या प्रदर्शनाच्या आयाेजनासाठी संस्थेचे मिलिंद पगार, अॅड.राजेश जुन्नरे, सुभाष पगारे, राहुल कुलकर्णी आदी परिश्रम घेत आहेत.
हे असेल रेअर फेअरचे आकर्षण
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.