आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जय मल्हार सोशल ग्रुपतर्फे आयोजन; ‘सांज पाडव्या’ला रसिकांचा प्रतिसाद

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर येथील जय मल्हार सोशल ग्रुपतर्फे मराठी नववर्ष व गुढीपाडव्यानिमित्ताने सांज पाडव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

गुढीपाडव्याचे औचित्य साधून जय मल्हार सोशल ग्रुपचे संस्थापक ऋषिराज खराटे यांनी सातपूर कॉलनी येथे रवी शेट्टी प्रस्तुत सांज पाडव्याचे आयोजन केले होते. गेल्या सात वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित केला जातो. सातपूरचे ग्रामदैवत भवानीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सांज पाडव्याला मोठी गर्दी उसळली होती. मराठी नवीन वर्षाच्या प्रारंभी कोरोनाच्या सावटातून लोक बाहेर पडल्याचा आपल्याला आनंद होत असून या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांचे चेहरे आनंदी झाले आहेत. ऋषिराज खराटे यांच्यासारख्या युवकाने या कार्यक्रमासाठी सतत घेतलेला पुढाकार देखील कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मनोगतातून काढले.

कार्यक्रमास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अंबादास खैरे, करण गायकर, जीवन रायते, योगेश गांगुर्डे, गोरख आहेर, विजय तुपलोंढे, प्रकाश महाजन, गणेश गोवर्धने, गुरू घोडके, रामेश्वर जाधव, अमित गुंबाडे, संतोष साठे, दीपक दशपुते आदी उपस्थित होते. ऋषिराज खराटे यांच्या कुटुंबियांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला.

बातम्या आणखी आहेत...