आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 महिलांचा हिरकणीरत्न पुरस्काराने गाैरव:साई धनवर्षा फाउंडेशनच्या वतीने आयाेजन, विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार

सिडकोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३१ महिलांना साई धनवर्षा फाउंडेशनच्या वतीने हिरकणीरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. पूर्वी साई आधार सोशल हेल्प फाउंडेशन, नाशिक या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक संस्थेच्या नावात बदल होऊन साई धनवर्षा फाउंडेशन, नाशिक असे नामकरण करण्यात आले आहे.

याच नामकरण सोहळ्याप्रसंगी हिरकणी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या पुरस्कारार्थी महिलांनी आपल्या मनाेगतात फाउंडेशनच्या कामाचे कौतुक केले. महिलांवरील अत्याचार तसेच लव्ह जिहादसारख्या घटना घडता कामा नये यासाठी कायदा करावा, असे निवेदन महिलांच्या स्वाक्षरीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फाउंडेशनतर्फे देण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित महिलांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली. यावेळी अध्यक्ष संजय देशमुख, संचालिका जानकी नाईक, संतोष धात्रक, प्रवीण पाटील, सारिका देशमुख, ललिता नवघिरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...