आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शल्य विशारदांची राष्ट्रीय प्रशिक्षण परिषद:नाशिकमध्ये आयोजन, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा सहभाग

प्रतिनिधी | नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणाऱ्या देशातील शल्य विशारदांची संघटना असलेल्या असोसिएशन ऑफ मिनिमल एक्सेस सर्जन्स ऑफ इंडियाची राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण परिषद शुक्रवार दि. 26 ते रविवार दि. 28 ऑगस्ट असे तीन दिवस नाशिक येथील लेखानगर परीसरातील हॉटेल ग्रँड रिओ येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी महाराष्ट्रासह देशातील अनेक नामांकित तज्ञ सहभागी होणार असल्याची माहिती संयोजन समितीचे समन्वयक डॉ. संदीप सबनीस यांनी दिली.

ज्ञानाची देवाणघेवाण

वैद्यकीय क्षेत्रात प्रभावी रुग्णसेवेसाठी दैनंदिन नव नवीन तंत्रज्ञान येत आहे या तंत्रज्ञानाची माहिती व्हावी तसेच ज्ञानाचे आदानप्रदान होण्यासाठी अशा प्रकारची वैद्यकिय तज्ज्ञांची प्रशिक्षण परिषद होणे अत्यंत उपयुक्त ठरत असते, असे डॉ.सबनीस यांनी दिव्य मराठीशी बोलतांना सांगितले.

प्रशिक्षण परिषदेसाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. सी पलानीवेलू, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. युगेंद्रा, डॉ.रॉय, सुनील पाटणकर, डॉ. समीर रेगे, डॉ रमेश डुंबरे व डॉ. जयसिंग शिंदे हे मान्यवर उपस्थित राहणार असून ही परिषद यशस्वी होण्यासाठी डॉ. प्रमोद शिंदे, डॉ सुरेश मालेगावकर, डॉ. रमेश पाटील , डॉ महेश मालू, डॉ. प्रशांत मुठाळ, डॉ स्वप्निल पारख, डॉ. शिल्पा दयानंद व डॉ. संतोष रावलानी हे प्रयत्नशील आहेत. या परिषदेला नाशिक सर्जिकल सोसायटी व सर्जन असोसिएशन ऑफ इंडिया यांचे देखिल मोलाचे सहकार्य लाभले आहे.

100 हून डॉक्टरांची उपस्थिती

तीन दिवसीय महत्त्वपुर्ण परिषदेचे उद्घाटन आय.एम.ए. चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.रवी वानखेडेकर करणार आहेत. या परिषदेमध्ये देशभरातील १०० पेक्षा जास्त डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. वैद्यकिय क्षेत्रातही वेगाने नवनवे तंत्रज्ञान येत असते, याची माहीती तज्ज्ञांकडून या परिषदेच्या माध्यमातून सहभागींना करून घेता येणार आहे, या मिळालेल्या माहीती व ज्ञानाचा वापर डॉक्टर्सला रूग्णांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. प्रशिक्षणानंतर सहभागी तज्ञांची परीक्षा होणार असून यशस्वी तज्ञांना प्रमाणपत्र दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...