आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा उद्याेजकांना प्राेत्साहन मिळण्यासाठी उपक्रम:उद्यमशील उद्योजकांसाठी ‘ओपेक्स 23’ चे आयाेजन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि प्रकल्प सादरीकरणातून उद्यमशील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या नाशिकस्थित सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट (SIOM) च्या वतीने ‘ओपेक्स २३’ चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे.

६ जानेवारी रोजी ही स्पर्धा होणार असून त्यात नोंदणी करण्यासाठी २५ डिसेंबर २०२२ ही अंतिम मुदत आहे. स्पर्धेमध्ये देशभरातील उद्योगांना त्यांचे संधी दिली जाईल. ही स्पर्धा भारतातील लघु, मध्यम तथा मोठ्या उद्योगसंस्थांसाठी खुली आहे. उद्योगांमधील सिक्स सिग्मा, लीन सिक्स सिग्मा, सायबर फिजिकल सिस्टिम,साइबर सिस्टिम, मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी, प्रोसेस एक्सलन्स यासंदर्भातील सर्व उपक्रमाची आणि प्रकल्पाची नोंदणी करता येईल, असे एसआयओएमचे संचालक डॉ.वंदना सोनवणे यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी www.siom.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. किंवा opex@siom.in वर ईमेल करावा. यात उद्याेमशील उद्याेजकांना प्राेत्साहन मिळेल. जास्तीत जास्त युवा उद्याेजकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...