आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानववर्षानिमित्ताने दिगंबर जैन समाजाचे धर्मगुरू प. पु. पुलकसागरजी महाराज यांच्या सान्निध्यात म्हसरूळ येथील गजपंथ येथे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. या महाेत्सवानिमित्त १०८ विद्यार्थ्यांकडून कलशाभिषेक, विश्वशांती यज्ञ करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना पुलकसागरजी महाराज यांनी सांगितले की, धर्माचे आचरण करण्यास मागे-पुढे पाहू नका. जीवनात प्रत्येकाने आई-वडील आणि साधू-संतांची सेवा करावी. लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवावे, माेबाइलमध्ये त्यांचा अधिकाधिक वेळ जाताे. ताेच वेळ चांगल्या कामांमध्ये गेला, सत्कारणी लागला तर जीवनाला एक वेगळी दिशा मिळेल. नीतीनुसर सर्वांनी आपले आचरण ठेवावे, आचरण शुद्ध आणि पवित्र असेल तर समाजात जगतानाही काेणत्याही अडचणी येत नाही. असे केल्यास जीवनात काही कमी पडणार नाही, असेही महाराज म्हणाले.
नववर्षानिमित्त आयाेजित या साेहळ्यासाठी जिल्हाभरातील जैन बांधव, भाविक सहभागी झाले हाेते. त्यानंतर रात्री आरती झाली. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास गजपंथचे कार्याध्यक्ष सुमेरकुमार काले, उपाध्यक्ष सुवर्णा काले, विश्वस्त सोनल दगडे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.