आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:सेल्फ डिफेन्सच्या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन; माई लेले विद्यालयात सेल्फ डिफेन्स शिबिर

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ नाशिक वेस्ट आणि श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी सेल्फ डिफेन्सच्या पाच दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि.२०) कार्यशाळेच उद्घाटन करण्यात आले.

शाळेमध्ये नवरचना शाळेतील नववीतील विद्यार्थिनी ब्लॅक बेल्ट होल्डर कनक कर्जातकर ही मुलांना स्वसंरक्षणाचे धडे देणार आहे. यावेळी रोटरी क्लब तर्फे विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. २०२१ मध्ये झालेल्या इंटरनॅशनल स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी रोटरीचे नाशिक वेस्टचे अध्यक्ष प्रदीप पछाडे, सचिव मनोज केंगे, माजी अध्यक्ष सीमा पछाडे, शाळेचे मुख्याध्यापक संतोष पाटील उपस्थित होते. शाळेच्या विशेष शिक्षिका अनिता निकम यांनी कार्यक्रमाची सूत्रे सांभाळली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...