आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन:16 हजाराहून अधिक प्रकरणांचा होणार निपटारा; वैवाहिक, नोकरी, पगाराशी संबंधित वादांचा समावेश

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये शनिवार (दि. 13) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलनी, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये होणाऱ्या लोकअदालतीत दिवाणी, तडजोडपात्र फौजदारी, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कौटुंबिक वाद, भुसंपादन, एन.आय. ॲक्ट कलम 138 बँक, वित्तीय संस्था व जिल्ह्यातील इतर न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली 16 हजार 200 प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

या प्रकरणांचा निपटारा

बँक, वित्तीय संस्था शासकीय आस्थापना यांच्या थकीत रक्कम वसुलीच्या 3 हजार दाखलपूर्व प्रकरणांचा निवाडा करण्यात येणार आहे. दिवाणी, चेक बाऊन्स, बँक वसुली, अपघात, न्यायाधिकाराबाबतची, कामगार वाद, वीज पाणी व कर देयके तसेच वैवाहिक वादाची, नोकरी विषयक पगार, इतर भत्ते व निवृत्तीबाबत तसेच महसूल विषयक आदी प्रकरणांचा निपटरा करण्यात येणार आहे.

लोकअदालतीचे फायदे

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून मिटलेल्या प्रकरणांना अपिल नसल्याने वादाला पूर्णविराम मिळतो. वाद तडजोडीने मिटल्यामुळे वादास कायस्वरूपी पूर्णविराम मिळून वेळ व पैशांचीही बचत होते. तडजोडीने वाद मिटल्यामुळे दोन्ही पक्षांचा विजय होतो. प्रलंबित प्रकरणांचा त्वरीत निपटारा होतो. कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळत असल्याने दोन्ही पक्षांचा फायदा होत असतो. तोंडी पुरावा उलट तपासणी दिर्घ युक्तीवाद टाळण्यास मदत होते.

बातम्या आणखी आहेत...