आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागर महानुभाव पंथाचा:नाशिकमध्ये 29 ते 31 ऑगस्टदरम्यान संत साहित्य संमेलनाचे आयोजन

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीचक्रधर स्वामी यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय महानुभाव पंथीय संत साहित्य संमेलनाचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात येत आहे. २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान हे संमेलन होणार आहे. या संदर्भात नियोजन व चर्चा करण्यासाठी आयोजकांनी आज विशेष बैठक घेतली. माजी आमदार व संमेलनाचे मुख्य आयोजक बाळासाहेब सानप यांच्या नांदूरनाका येथील फार्म हाऊसवर ही बैठक झाली.

संत संमेलनात महानुभव पंथीय संत, महंत, भिक्षुक, पुजारी मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. त्यामुळे बैठकीस जिल्ह्यातील संत, महंत तसेच पुजारी उपस्थित होते. आचार्य महंत श्रीसुकेणेकर बाबा, महंत डोळसकर बाबा, महंत चिरडे बाबा, महंत कृष्णराज मराठे बाबा, आमदार बाळासाहेब सानप आदिंनी संमलेन कशा पद्धतीने यशस्वी करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले.

जिल्हा निवासी महंत वालहेराज बाबा, महंत सायराज बाबा, महंत परसराम बाबा, महंत गोपिराज शास्त्री, माजी नगरसेवक दिनकर पाटील, प्रकाश ननावरे, सुरेश डोळसे, राजेंद्र जायभावे, लक्ष्मण जायभावे, भास्करराव सोनवणे आदिंनी संमेलनाच्या नियोजनाबाबत चर्चा केली. कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी रविवार (दि. १९) दिनकर अण्णा पाटील यांच्या निवास स्थानी गंगापूर गाव येथे दुपारी ४ वाजता पुन्हा बैठक घेण्याचा निर्णयही बैठकीत झाला.

बातम्या आणखी आहेत...