आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन; मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा रंगणार जुलैमध्ये

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने २०२२-२३ जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन जुलैच्या पहिल्या सप्ताहात करण्यात आले आहे. राष्ट्रीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन १ सप्टेंबर ते १७ आक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचा संघ सहभागी होण्यापूर्वी जिल्हा, विभाग व राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील १४ वर्षा खालील मुले आणि १७ वर्षा खालील मुले व मुली या गटांमध्ये स्पर्धा जुलैत होईल. स्पर्धेत सहभागी होवु इच्छिणारा १४ वर्षांखालील खेळाडू १ जानेवारी २००९ रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असावा तर १७ वर्षांखालील खेळाडू हा १ जानेवारी २००६ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. इच्छुक संघांनी २८ जूनपर्यंत www.subrotocup.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

बातम्या आणखी आहेत...