आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:.अन‌् कामगारांना पुन्हा मिळाले काम ; प्रवेशद्वारावर आंदोलन

सातपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर औद्योगिक वसाहतीतील सुप्रीम ऑटो सेल इंडिया प्रा. लिमिटेड या कंपनीतील कामावरून कमी केलेल्या कामगारांसह हिमाचल प्रदेशात बदली केलेल्या ५५ कामगारांनी सोमवारी (दि. ६) आपल्या कुटुंबियांसह सकाळपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. मात्र शहर पोलिस आयुक्तालयात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असल्याने सातपूर पोलिसांनी कामगारांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अटक करून पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यातच कामगार, सीटू युनियन प्रतिनिधी व कंपनी व्यवस्थापन यांच्यात पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी यशस्वी चर्चा घडवून आणल्याने आंदोलनकर्त्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. सुप्रीम ऑटो सेल कारखान्यातील कामगारांची करारानुसार नऊ महिन्यांपासून वेतनवाढ रखडलेली होती. त्याचा लाभ मिळावा अशी मागणी युनियनने केली होती. मात्र व्यवस्थापनाने कंपनीतील १५ कामगारांची हिमाचल प्रदेशातील शाखेत बदली करत ५५ कामगारांना कामावरून कमी केले. यावरून सोमवारी सकाळपासूनच कामगारांनी कुटुंबियांसह कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. तेथे पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी कामगारांसह सीटू युनियनचे प्रतिनिधी व व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून समेट घडवून आणला. त्यामुळे मंगळवारपासून (दि. ७) कामगारांना कामावर घेण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...