आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये राज्यपालांच्या विरोधात संताप:शिवजन्मोत्सव समितीने राष्ट्रपतींना पाठवले 5000 पोस्ट कार्ड

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवावे, या मागणीसाठी शिवजन्मोत्सव समिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाच हजार पोस्ट कार्ड पाठवले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे कोश्यारी यांनी पुन्हा नव्याने वाद ओढवून घेतला आहे.

कोश्यारी यांना हटाव अशी मागणी करणारे पत्र नागरिकांकडून लिहून घेतले जात आहे. तसेच दोन दिवसानंतर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने जिल्ह्यातील गावागावात ही पत्रे देऊन त्यावर नागरिकांच्या स्वाक्षरी घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविण्यात येणार असल्याचे समितीचे माजी अध्यक्ष राजेश कोकणे यांनी सांगितले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना थेट आत्ताच्या राजकीय नेत्यांसोबत केल्याने राज्यातील शिवप्रेमी संतापलेले आहे. जागोजागी राज्यपाल यांना महाराष्ट्रातून हटवावे याची मागणी होत आहे. मात्र, यावर केंद्र सरकार कोणताही तात्काळ निर्णय घेत नसल्याने शिवप्रेमींनी कोश्यारी यांच्या विरोधात पत्र लिहून ती राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात गुरुवारी नाशिक रोड येथील शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून पाच हजार पोस्ट कार्ड टपाल खात्यात देण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील विविध गावांमधून ही पोस्ट कार्ड राष्ट्रपतींना देण्यात येणार असून याची संख्या ही 11, 000 होणार आहे. नाशिक रोड येथे गुरुवारी राज्यपालांना हटविण्यासाठी महिलांचा आणि तरुणांचा मोठा वर्ग दिसून येत होता. यासाठी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करीत काळा मंडप टाकून तसेच पदाधिकाऱ्यांनी हातावर काळे रिबीन बांधून राज्यपालांचा निषेधही केला. यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह महिला व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...