आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्य:रमेश अय्यर यांना ‘आउटस्टँडिंग सिटिझन ऑफ नाशिक’ पुरस्कार

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजसेवा सेवक रमेश अय्यर यांना ‘नाशिक सिटिझन्स फोरम’च्या ‘आउटस्टँडिंग सिटिझन ऑफ नाशिक’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नाशिकच्या उन्नती आणि उत्थानासाठी विविध क्षेत्रांत अविरतपणे कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या कामाला दाद देण्यासाठी ‘नाशिक सिटिझन फोरम’तर्फे दर महिन्याला ‘आउटस्टँडिंग सिटिझन ऑफ नाशिक’ हा पुरस्कार देण्यात येताे. अय्यर यांनी सामाजिक कार्यासाठी गीव्ह वेल्फेअर ऑर्गनायझेशनची स्थापना केली आहे. मात्र केवळ आपल्या या संस्थेपुरतेच मर्यादित ठेवलेले नाही तर त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांत काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांनाही ते समरसून साथ देत असतात. एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीतील सीईओची नोकरी सोडून नाशिकला स्थायिक होत १९९५ सालापासून समाजकार्याला त्यांनी वाहून घेतले. पर्यावरणरक्षण आणि जखमी झालेले पशू आणि पक्षी यांची सुश्रुषा हेही त्यांचे काम आहे. आदिवासी भागातील शंभर शाळांना त्यांनी टॉयलेट बांधून दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...