आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइकाे-इकाे संस्था आणि वनविभाग यांच्याकडून गेल्या वर्षभरात पाचशेहून अधिक सापांना जीवनदान देण्यात आले आहे. गंभीर इजा झालेल्या अनेक सापांवर उपचारही करण्यात येऊन त्यांना त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले असल्याचे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले.
शेकडाे वर्षांची परंपरा जपत नाशिकककरांनी मखमलाबादमध्ये नागपंचमीनिमित्ताने यात्रा भरवली, दुसरीकडे वर्षभरात ५०० पेक्षा अधिक सापांना जीवनदान देण्याचे गौरवास्पद काम केल्याचे समोर आले आहे. जैव शृंखलेत सापांचे मोठे महत्त्व असले तरी साप म्हटला की ताे विषारीच अशी धारणा लाेकांची बनलेली आहे, पण वास्तवात तशी स्थिती नाही. जैव शृंखलेत सापांची भूमिका महत्त्वाची असल्याने ताे शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो. नाशिककरांनी वर्षभरात पाचशेवर सापांना जीवनदान दिल्याने त्यांना सापांचे महत्त्व नक्कीच माहीती असल्याचे अधाेरेखीत हाेतेे.
शहरवासीयांमध्ये साप वाचावेत याकरिता जागृती असल्यानेच पाचशेवर सापांना जीवनदान देता आले असे इकाे-इकाे संस्थेचे सदस्य सांगता. दुर्दैवाची बाब म्हणजे, पावसाळ्यात शेतात पाणी साचल्याने साप रस्त्यावर येतात, कारण ते काेरडे असतात पण त्र्यंबकेश्वर-नाशिक दरम्यानच्या परिसरात, रस्त्यांवरील वर्दळीच्या भागांत या काळात दिवसाला किमान दहा ते बारा साप वाहनांखाली सापडून मरतात, असे इकाे इकाे संस्थेचे अभिजीत महाले यांनी सांगितले.
नाशिक परिसरात आढळणारे साप
या संस्थेला नाशिक व परिसरात धामण, गवत्या, तस्कर, धुळ नागीण, डुरक्या, घाेणस, नानेटी या प्रकारचे बिनविषारी साप आढळले. तर नाग, मण्यार, घाेणस, फुरसे या जातीचे विषारी सापही परिसरात असल्याचे संस्थेच्या सदस्यांनी सांगितले.
घर व घराजवळ अशी घ्या काळजी
घराजवळ पालापाचोळा साचू देऊ नका.
भिंतीच्या भेगा व बिळे नेहमी बुजवावीत.
गाेवऱ्या, सरपणाची लाकडे उंचावर ठेवावी.
शेतात, घराबाहेर झोपताना पलंगावर झाेपावे
खरकटे अन्न व कचरा लांब फेकावे.
पाळीव प्राणी, ससे, पोपट, कोंबड्या घरापासून दूर व थाेड्या उंचीवर असावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.