आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानसिक आजार कायमचा नाही तर त्यावर उपाय आहे. तज्ज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन वेळेत मिळाले तर मानसिक आजार नाहीसा हाेतो. या आजारावर उपचारासाठी नवीन तंत्रज्ञान आले आहे, अशी सुर मानसोपचार तज्ज्ञांच्या संघटनेने आयाेजित केलेल्या दोन दिवसीय परिषदेत उमटला.
जेष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ शिरीष सुळे यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन झाले. त्यावेळी वेस्ट झोन प्रेसिडेंट डॉ उमेश नागापूरकर, डॉ संजय कुमावत, डॉ बी एस व्ही प्रसाद, डॉ हेमंत सोननीस व डॉ स्वाती वंजारी उपस्थीत होते. शनिवारी डॉ रोहन शाह, धुळे यांचे अॅडल्ट एडीएचडी या विषयावर व्याख्यान आणि डॉ तुषार भट, धुळे यांचे नैराश्यसाठी केटामीन थेरपी या वर मार्गदर्शन केले. ठाण्याचे डॉ शैलेश उमाटे यांनी लैंगिक समस्या आणि मानसोपचाराची औषधे या वर उपस्थितांना माहती दिली तर नाशिकचे डॉ अनुप भारती यांनी ‘प्रेम व इंटिमसी’ या विषयावर उपयुक्त महिती दिली. यावेळी डॉ नकुल वंजारी यांनी सूत्र संचालन केले. उत्तरं महाराष्ट्रातील ३५ मानसोपचरतज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले आहेत. रविवारच्या सत्राची सुरवात डॉ नील शाह यांच्या ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर या व्याख्यानाने झाली. औरंगाबादचे डॉ आनंद काळे यांनी चित्रपट आणि मानसिक आरोग्य या विषयी सादरीकरण केले. डॉ आनंद पाटील यांनी ‘पैसा आणि मानवी मनाचे भावविश्व’ या आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. नव्याने आलेल्या ‘मानसिक आरोग्य कायदा २०१७ या विषयी डॉ संजय कुमावत यांनी मार्गदर्शन केले. उत्साहाच्या वातावरणात या विषयांवर निकोप चर्चा झाली ज्यात सर्व उपस्थित डॉक्टरांनी सहभाग घेतला. यामुळे रुग्णसेवा करतांना फायदा तर होईलच पण सर्वांना व्यक्तिगत आयुष्यातही फायदा होणार अशी सर्वांची भावना होती.
डॉ नागापूरकर यांचे नेतृत्वात नाशिक सायकिअट्रीक सोसायटीने ह्या परिषदेचे यशस्वी आयोजन केले. डॉ निलेश जेजुरकर, डॉ जयंत ढाके, डॉ मुक्तेश दौंड, डॉ विलास चकोर आणि डॉ महेश भिरूड यांनी सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.