आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासादायक:ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती सुधारणार, औद्योगिक वापराचे 1200 सिलिंडर जमा

नाशिक12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • औद्योगिक सिलिंडरमध्ये बदल करून रुग्णांसाठी करणार त्याचा वापर; ऑक्सिजन समन्वयक नितीन गवळी यांची माहिती

जिल्ह्यातील अाॅक्सिजन रिफिलर व अाॅक्सिजन निर्माते यांच्याकडील सिलिंडर पूर्णपणे वापरली जात असून उद्याेगांकडून अाैद्याेगिक वापराचे १२०० सिलिंडर देखिल जमा करून ते वैद्यकीय कारणासाठी वापरण्यास सुयाेग्य व्हावेत अशापक्रारे त्यात बदल करण्यात अाले अाहेत. मात्र, तरीही सिलिंडरचा तुटवडा कायम असून रुग्णसंख्या मात्र कमी हाेत नसल्याने अाणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण हाेत अाहे. याचमुळे अाता एमअायडीसीने उद्याेजकांना त्यांच्याकडील सिलिंडर गॅस कंपनी अथवा रिफिलर यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात परत करावेत, असे अादेश दिले अाहेत.

काही रुग्णालयांकडे अतिरिक्त साठा
काही रुग्णालयांत अाॅक्सिजन शिल्लक नाही तर काही ठिकाणी दाेन तास पुरेल इतकाच अाॅक्सिजन असल्याचे चित्र अाहे. काही हाॅस्पिटलकडे क्षमतेपेक्षाही जास्त अाॅक्सिजन पुरवठा झाल्याचे मुख्य कारण या तुटवड्यामागे जसे अाहे तसेच ते बालाजी एजन्सीजला कच्चा माल न दिल्याने त्यांनी पुरवठा बंद केल्याचेही कारण समाेर येत अाहे. ज्या हाॅस्पिटल्सने अाॅक्सिजनचा साठा केला अाहे त्यांच्यावर अाणि ज्यांनी ताे पुरविला त्यांच्यावर कारवाई हाेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे.

सिलिंडर पुन्हा परत करणार
सध्याची परिस्थीती अत्यंत बिकट असली तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न अाॅक्सिजन समन्वयकांकडून केला जात अाहे. त्याचाच भाग म्हणून उद्याेगांचे सिलिंडर जमा करण्यात येत असून गरज संपल्यानंतर संबंधितांना हे सिलिंडर परत केले जातील अशी ग्वाही देण्यात अाली अाहे. यामुळे अाता प्रत्येक फॅब्रिकेटर व अाैद्याेगिक वापराचे सिलिंडर वापरणाऱ्या उद्याेगांना ते तातडीने परत करावे लागणार अाहेत. नाहीतर कारवाइचा सामना संबंधितांना करावा लागू शकताे.

अाॅक्सिजन सिलिंडर जमा करण्याचे उद्योजकांना आदेश
हाॅस्पिटलमध्ये जितके अाॅक्सिजन बेड‌्स‌, व्हेंटिलेटर्स व रुग्ण क्षमता असेल त्यानुसारच अाता अाॅक्सिजन सिलिंडर पुरवठा केला जाणार अाहे. यामुळे अनेक ठिकाणी अाॅक्सिजन उपलब्ध नसल्याने इतरत्र रुग्ण हलविण्याची वेळ अालेल्या रुग्णालयांनाही पुरेसा अाॅक्सिजन उपलब्ध हाेऊ शकेल व साेमवारी सायंकाळपर्यंत अाॅक्सिजन पुरवठ्याच्या परिस्थितीत सुधारणा हाेईल, अशी ग्वाही अाॅक्सिजन समन्वयक व एमअायडीसीचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांनी दिली. दरम्यान, अाैद्याेगिक वापराचे सिलिंडर रुग्णालयांच्या वापरासाठी जमा करण्याचे अादेश गवळी यांनी उद्याेजकांना दिले असून त्यानुसार १२०० सिलिंडर संकलित करण्यात अाले अाहेत. यामुळे अाॅक्सिजन पुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा हाेण्याची चिन्हे असून रुग्णांसाठी हि दिलासादायक बाब ठरणार अाहे. उर्वरित. पान ४

बातम्या आणखी आहेत...