आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
उत्तरेकडील शीत लहरींमुळे जिल्ह्यातील पारा गेल्या आठवड्यापासून घसरला असून गुरुवारी (दि. १२) सलग तिसऱ्या दिवशी निफाड तालुक्यातील ओझर मिग येथे ७.६ एवढे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. नाशकातही पारा १०.४ तर निफाडला ८.५ तर मनमाडला ११.९ वर घसरल्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. दरवर्षी साधारणत: जानेवारी, फेब्रुवारीत नीचांकी तापमानाची नोंद होते. परंतु, वातावरणातील बदलामुळे यंदा नोव्हेंबरमध्येच पारा अधिक घसरला आहे.
राज्यात जेव्हा जेव्हा थंडीची लाट येते तेव्हा निफाड परिसरातले तापमान सर्वात अधिक घसरते. निफाड हे समुद्रसपाटीपासून ५५१ मीटर उंचीवर आहे. नाशिकची समुद्रसपाटीपासूनची उंची ५८४ मीटर आहे. नाशिकच्या तुलनेत निफाडची उंची ३३ मीटरने म्हणजेच सुमारे शंभर फुटांनी कमी आहे. नाशिक, सिन्नर, चांदवड आदी गावांपेक्षा निफाड नेहमीच जास्त गारठण्याचे मुख्य कारण हा उंचीतला फरका आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.