आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्दैवी:रुग्णाला वाचवण्यासाठी आधी व्हेंटिलेटर बेडची शोधाशोध, तर मृत्यूनंतर रुग्णवाहिका, वैकुंठरथ न मिळाल्याने मृतदेह दोन तास घरातच

ओझर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ओझरला कोरोना बाधित रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वैकुंठरथच नाही

गेल्या महिन्याभरापासून वाढलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे निफाड तालुक्यातील असलेल्या सर्व कोविड सेंटरला ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटर बेडसाठी शोधाशोध करावी लागत आहे. असे असताना तब्बल चार दिवसांनीही बेड उपलब्ध न झाल्याने रुग्णाला आपल्या राहत्या घरीच ऑक्सिजन देऊन वाचवण्यासाठी प्रयत्न केला. परंतु त्या कुटुंबाला यश आले नाही दुर्दैवाने बुधवार दि.28 रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पंडित कॉलनी येथिल रहिवासी किसनराव कदम (वय.70) यांचा दुर्दैवी कोरोनामुळे निधन झाले. परंतु त्या मृत्यू नंतरही त्या मृतदेहाला अंत्यसंस्कार करण्यात घेऊन जाण्यासाठी गावात कोणत्याही प्रकारची वैकुंठरथाची किंवा रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध न झाल्याने त्या मृतदेहाला तब्बल दोन तास हुन अधिक काळ पीपीई किटमध्ये बंद करून ठेवण्याची नामुष्की कुटुंबातील व्यक्तींना आली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून ओझरला नगरपरिषदेचा वैकुंठरथ अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येत आहे. परंतु एकच वैकुंठरथ असल्याने फक्त विना कोरोना बाधित मृत्यू झाल्यास त्या मृतदेहाला घेऊन जाण्यासाठी त्याचा वापर करण्यात येत आहे. तो जर कोरोना बाधित मृत्यू झालेल्या व्यतिसाठी वापरला तर परिसरात कोरोना वाढेल अशी भीती नगरपरिषद कर्मचारी यांनी व्यक्त केली आहे.

वाढलेल्या कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचेही प्रमाण अधिक असून येथे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी वेगळा वैकुंठरथ किंवा रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तर ओझरला वाढलेल्या कोरोनामुळे जवळपास 101 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. ओझर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात होणाऱ्या रॅपिड टेस्टमध्ये सत्तरहुन अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्यामुळे ओझरला कोरोना बाधितांचा आकडा जवळपास 850 हुंन अधिक झाला असुन नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन ओझर प्राथमिक आरोग्याच्या वैद्यकीय अधिकारी वैशाली कदम, अनिल राठी यांच्याकडून करण्यात येत आहे.

ओझर प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली 102 व 108 या रुग्णवाहिकांमध्ये कोरोना मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांना वापरण्यात येत नाही. - वैशाली कदम, ओझर प्राथमिक केंद्र वैद्यकीय अधिकारी

गेल्या चार दिवसांपासून मी स्वतः होते नव्हते तेवढे पर्याय उपलब्ध करून ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर बेडसाठी पिंपळगाव, नाशिक, निफाड येथे शोधाशोध केली.परंतु मला कुठेही याची उपलब्धता झाली नसल्याने मी वडिलांना वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ला नुसार घरी ऑक्सिजन देण्यास सुरूवात केली परंतु त्याला यश आले नाही. दुर्दैवाने आज माझे वडील आम्हाला सोडून गेले. - नागेश कदम, मुलगा

नगरपरिषदेचा असलेला वैकुंठरथ हा फक्त विना कोरोना बाधित मृत्यू झालेल्या मृतदेहासाठी वापरण्यात येतो. कारण की जर कोरोना बाधीत रुग्णांच्या अंत्यसंस्कार नेण्यासाठी वापरन्यात आला तर त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह हा रुग्णवाहिकेतच अंत्यसंस्कारासाठी न्यावा व योग्य ती खबरदारी घ्यावी. - शरद घोरपडे, प्रशासक ओझर नगरपरिषद

बातम्या आणखी आहेत...