आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रमाचे आयोजन:राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याची आज ओझरला सांगता

ओझर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर समर्थ उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सदगुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत सुरू असलेल्या राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याची सांगता सोमवारी (दि.५) ओझरसह वेरूळ (आैरंगाबाद) गोंडगाव (जळगाव) पुणतांबा (अहमदनगर) येथे होणार आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक, सदगुरू पाद्य पूजन, संत-अतिथी-ब्राम्हण पूजन, प्रवचन, सत्संग, भजन यासह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तपस्वी निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या ३३ व्या पुण्यस्मरणार्थ समर्थ उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्रीसंत सद्गुरू स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरनेने आणि प्रमुख उपस्थितीत ओझरच्या जनशांती धामात देव-देश-धर्मासाठी सुरू असलेला राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या उत्साहात सुरू आहे.

या सोहळ्यात महाजपानुष्ठान, अखंड नंदादीप, हस्त लिखित नामजप, रोज पहाटे ५ वाजता ब्रम्हमुहूर्तावर नित्यनियम विधी, प्राणायाम, ध्यान, भागवत वाचन, महाआरती, भजन, प्रवचन, सत्संग यासह विविध कार्यक्रम सुरू आहेत. यानिमित्त आेझर येथील मंदिरावर आकर्षक राेषणाई करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...