आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:‘स्वरप्रभात’तर्फे पं. भीमसेन जोशी यांना आदरांजली

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वरप्रभात संगीत यांनी ३ एप्रिल रोजी गुरुवंदना व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना आदरांजली कार्यक्रम सादर केला माधव दसककर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. संचालिका नीलाताई देशपांडे यांनी रामाचे एक भक्तिगीत सादर केले. तर क्लासच्या विद्यार्थ्यांनी गुरुवंदना सादर केली. कार्यक्रमात हर्ष, आर्यन, लबधी, रमा, रेवती, रेणू या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १५ निरनिराळ्या रागांवर हरी नामावली श्लोक सादर करण्यात आला.

वैशाली, कविता, विनिती, हर्षा, शुभदा यानी पंडितजींना आदरांजली वाहिली. सरिताताई देशमुख यांनी अधिक देखणे हा अभंग म्हटला. रेवती कुलकर्णी यांनी नामाचा गजर म्हटला, नेहा सराफ यांनी अहीर भैरव रागातील राम का गुणगान करी य हे गीत सादर केले. इंद्रायणीकाठी हे निशांत नाईक व प्रणव पाटणकर यांनी सादर केले. अभंग रंगाची रंगत वाढवली चिन्मय केळकर यांनी तर भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली अमीर राजा यांनी.

बातम्या आणखी आहेत...