आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री गजानन महाराज सेवा संस्था नाशिकतर्फे श्रींच्या प्रकट दिनानिमित्त सोमवारी (दि. १३) श्री यशवंतराव महाराज पटांगण गंगाघाट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता श्रींची पालखीची मिरवणूक निघणार आहे. रविवार पेठ, लोणार लेन शंकरराव शिरसाट यांच्या घरापासून मिरवणूक निघेल. मेन राेडमार्गे गाडगे महाराज पुतळा, भद्रकाली तिवधा चौक, सोमवार पेठ, नेहरू चौक येथून गंगा घाट यशवंतराव महाराज पठांगण येथे मिरवणुकीची सांगता होईल.
दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान श्रींचा महाअभिषेक, महाआरती व प्रसादाचे आयोजन केले आहे. दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान भजनाचा कार्यक्रम होईल. चार वाजता नाशिक शहरातील आदर्श व्यक्ती व आदर्श शिक्षकांचा सत्कार आणि श्रींच्या प्रकट दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस समारंभ होणार आहे. सायंकाळी सहा ते नऊ वाजेच्या दरम्यान कीर्तन व अभंग हाेईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.