आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी:संत निवृत्तिनाथांची पालखी श्रीरामपूर नगरीत; पालखी मार्गावर राजेंद्र जुन्नरकर रांगोळीची सजावट

नाशिक3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

त्र्यबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेली संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या दिंडीचे श्रीरामपूर नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. सुश्राव्य भजने येथील बँड पथकाने गायन करत पालखीचे स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या फुलांची उधळण लक्ष वेधून घेत होती. श्रीराम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा प्रणिती गिरमे, यांच्यासह रौनक गिरमे, गौतम उपाध्ये यांनी पालखी पूजन केले. यावर्षी पालखीस मुरंबीच्या गजीराम मते यांच्या बैलांची जोडी यांची सारथ्य करत आहे. पालखी मार्गावर राजेंद्र जुन्नरकर रांगोळीची सजावट करत आहे.

बातम्या आणखी आहेत...