आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवाशांत भीती:शालिमार एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला आग; एकवीस टन वस्तू जळून खाक

नाशिक रोडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकात्याहून ३ नोव्हेंबर रोजी कुर्ला टर्मिनसकडे निघालेली शालिमार एक्स्प्रेस आधीच आठ तास विलंबाने धावत असताना शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास नाशिक रोड रेल्वेस्थानकात या गाडीच्या इंजिनजवळील पार्सल बाेगीला आग लागली. पार्सल बोगीतून धूर निघत असल्याचे दिसल्याने स्थानकातील आणि गाडीतील प्रवाशांत भीती पसरली होती. या आगीत २१ टन वस्तूंची राख झाली होती.

आग विझविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे काेणतीही यंत्रणा नसल्याने नाशिकच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत आग रोखली. या गाडीतील प्रवाशांना या घटनेमुळे आणखी तीन तास विलंब झाला. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अधिकारी मात्र वेगवेगळ्या विभागाकडे बोट दाखवत होते.

लहवीत गावाजवळील एक्स्प्रेसचे घसरलेले डबे अजूनही पडून असतानाच शनिवारी शालिमार एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला आग लागली. पार्सल बोगीतून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे प्रवाशांना दिसल्याने त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती दिली. अग्निशमन दलाला सूचना दिल्यानंतर बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु प्लॅटफाॅर्मपर्यंत बंब किंवा रुग्णवाहिका येण्याची सुविधा नव्हती. आग विझविण्यासाठी मुख्य तिकीट तपासनीस विजय धोटे, तिकीट तपासनीस डी. बी. पाटील यांनी आग लागलेल्या पार्सल बोगीत प्रवेश करून वस्तू वाचवण्याचा प्रयत्न केला. तर नाशिक रोड रेल्वेस्थानकातील कुली समाधान पाटील, रवी साळवे, जगन्नाथ हराळे संतोष तुरकणे, रामदास काकड, संतोष बरके यांनीही जिवावर उदार होत आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला.

रेल्वेकडून प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही आठ तास विलंबाने धावणाऱ्या एक्स्प्रेसला आग लागल्यामुळे आणखी अडीच तास विलंब झाला. त्यामुळे प्रवासी ताटकळले. रेल्वेने प्रवाशांना नाष्टा किंवा इतर काेणतीही सुविधा पुरवली नव्हती. पहाटे चारला पोहोचणारी शालिमार एक्स्प्रेस १२ वा.ा नाशिक रोड रेल्वे स्थानकातून पुढे धावली. त्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते.

बातम्या आणखी आहेत...