आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिय्या आंदोलनाचा इशारा:'जेएमसिटी' शाळेविरुद्ध पालक संतप्त, शैक्षणकि प्रवेशद्वारावर 18 जुनला करणार आंदोलन

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जेएमसिटी' इंटरनॅशनल शाळा शुल्क वाढीसह कोरोनाकाळातील शुल्क पूर्ण माफ करण्यासाठी पालकांकडून 18 जुनला शाळेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केला जाणार आहे. यासंदर्भात शनिवारी मुंबईनाका पोलिस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला.

शाळेमसोर पालक करणार ठिय्या आंदोलन

कोरोनाकाळात शाळा ऑनलाईन सुरू होती त्याचे देखिल पूर्ण शुल्क मागीतले जात असल्याने शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची मागणी 'जेएमसिटी' इंटरनॅशनल शाळेच्या पालकांकडून केली जात होती. यासंदर्भात गेल्या शनिवारी पालकांनी शाळेविरोधात आंदोलन ही केले होते. पालकांची मागणीची दखल घेत ट्रस्टींकडून कोरोनाकाळातील 50 टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय पालकांकडून अमान्य करण्यात आला आहे.तसेच, आंदोलन सुरुच ठेवण्याची भूमिका पालकांकडून घेण्यात आली.

यासंदर्भात पालकांकडून 18 जुनला 'जेएमसिटी' कॅम्पसच्या बाहेर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. शनिवारी पालकांकडून मुंबईनाका पोिलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल रोहकले यांच्याकडे पत्र देत आंदोलनाची रितसर पारवानगी मागण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...