आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद ‎द्विगुणित:पाल्यांच्या क्रीडा स्पर्धेत पालकांचाही सहभाग‎

सातपूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत ‎राजीवनगर येथील बिग ड्रीम्स‎ प्री-स्कूलने आपला वार्षिक स्‍पोर्ट्‌्स डे ‎साजरा केला. विद्यार्थ्यांच्या या‎ क्रीडा स्पर्धेत त्यांच्या पालकांनीही ‎सहभाग नोंदवत स्पोर्ट‌्स डेचा आनंद ‎द्विगुणित केला.‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी‎ स्केटिंग असोसिएशन ऑफ ‎ महाराष्ट्रच्या प्रमुख सविता बुळंगे ‎ ‎उपस्थित होत्या. शाळेचे संस्थापक‎ एम. के. सिंह आणि संचालक डॉ.‎ अनिमेश पाटील यांच्या हस्ते‎ ध्वजारोहण करत कार्यक्रमाला‎ सुरुवात करण्यात आली.

यावेळी‎ चिमुकल्यांनी सूर्यनमस्कार सादर‎ करत उपस्थितांची दाद मिळवली.‎ लिटिल चॅम्प्सनी टर्टल रेस, शटल‎ रेस, हर्डल रेस आणि इतर अनेक‎ क्रीडा स्पर्धा सादर केल्या. क्रीडा‎ स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना‎ बक्षीस वितरणाने गौरविण्यात आले.‎ संस्थेच्या मुख्याध्यापिका तान्यासिंग‎ पाटील यांनी उपस्थितांचे आभार‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...