आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या फी वाढीविरोधात पालक संतप्त:नाशिकच्या जेएमसिटी इंटरनॅशनल शाळेच्या विरोधात पालकांचे ठिय्या, निर्णय 10 जूनला

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा प्रशासनाकडुन चक्क 6 हजार रुपये शुल्क वाढविण्यात आल्याने तसेच कोरोनाकाळात शाळा ऑनलाईन सुरू होती त्याचे देखिल पूर्ण शुल्क मागितली जात असल्याने शैक्षणिक शुल्कात सवलत देण्याची मागणी 'जेएमसिटी' इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा घस्टे यांनी अमान्य केल्याच्या निषेधार्थ पालकांनी शनिवारी (दि.४) शाळेविरोधात आंदोलन केले.

शाळेच्या आवारातून सुरु झालेले आंदोलन तीव्र झाल्याने पालकांकडून शाळेच्याबाहेरील वडाळारोडवरी रास्ता वाहतूकीसाठी बद करत रास्ता रोको केला. सकाळी 11 वाजेपासून सुरु असलेला हा आंदोलन सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालले असून ट्रस्टींच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

शहरातील वडाळारोडवरील जेएमसिटी इंटरनॅशनल शाळेच्या शुल्कवाढीसंदर्भात मागील काही दिवसापासून पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती.यामुळे शनिवारी शाळेकडून पालक-शिक्षक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत शुल्कवाढ व कोरोनाकाळातील शुल्कावरुन वादाला सुरुवात झाली.शुल्कवार काहीच तोडगा निघणार नसल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा घस्टे यांनी सागितले.

शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा करुनही हा प्रश्न निकाली न निघाल्याने पालकांकडून शाळेच्या आवारातच ठिय्या देत आंदोलन सुरु करण्यात आले.काही वेळातच हा आंदोलन तीव्र झाल्याने पालकांकडून शाळेच्याबाहेरील वडाळारोडवरी रास्ता वाहतूकीसाठी बद करत रास्ता रोको केला.यामुळे परिसरात प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती. कोरोनामुळे शाळा ऑनलाईन सुरू असल्याने विद्यार्थ्यांना त्याचा शैक्षणिकदृष्ठ्या फायदा होत नाही.

तसेच, पालकांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही विद्यार्थ्यांच्या पालकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन शाळेने शुल्क माफ करण्याची मागणी पालकांनी केली होती. यासंदर्भाततब्बल शेकडो पालकांनी शाळेकडे लेखी पत्र ही दिले. मात्र, कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने संतप्त पालकांनी शनिवारी आंदोलन केले.यानंतर तब्बल तीन तास रास्ता रोको झाल्यानंतर काही पालकांना चर्चा करण्यासाठी ट्रस्टी व मुख्याध्यापकांनी बोलवले.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष हाफिज हिसामोद्दीन साहब खतिब,ट्रस्टी हाजी रऊफ पटेल,अहेसान खतिब,शेखन खतिब उपस्थित होते. पालकांची कार्यालय‍ात एन्ट्री होताच शाळेतील शिक्षकांनी त्यांना भावनिक आवाहन केले. तुम्ही फीस नाही भरली तर आमचे वेतन कसे होणार? असा सवाल उपस्थित केला. परंतु, पालकांनी केवळ कोरोनाकाळातील शुल्क माफ करा आणि थेट 6 हजारांपर्यंत वाढविण्यात आलेले शुल्क कमी करण्याची मागणी पालकांनी यावेळी केली.दरम्यान,10 जुनपर्यंत यासंदर्भात निर्णय घेतले जाणार असल्याचे लेखी आश्वासन ट्रस्टींकडून देण्यात आल्याने हा आदोलन मागे घेण्यात आला.

50 टक्केच आकारणार...

पालकांचे अडीअडचणी जाणून घेण्यासाठीच आज आम्ही पालक शिक्षक बैठकीचे आयोजन केले होते.यात कोरोनाकाळातील दोन वर्षाचे शुल्क माफ करण्याची मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. मात्र,आम्ही 50 टक्के शुल्क कमी करत आहे.आता 10 जुनला निर्णय घेतला जाणार आहे. असे हिसामोद्दीन खतिब,अध्यक्ष,जेएमसिटी यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...