आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षणाच्या मूलभूत हक्कांनुसार इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत कुठलाही विद्यार्थी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेऊ इच्छित असेल तर जुन्या शाळेने त्याचे टी. सी. (ट्रान्सफर सर्टिफिकेट) देणे बंधनकारक आहे. तसे न झाल्यास विद्यार्थ्यांच्या वयाचा पुरावा ग्राह्य धरून लागलीच त्याला वयानुसार वर्गात प्रवेश द्यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने जाहीर केला आहे. यामुळे ३०० शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत प्रवेश मिळाला आहे. यासाठी नाशिक पॅरेंट्स असाेसिएशनने दिलेल्या लढ्याला यश आले आहे. शासननिर्णयाचा आधार घेत नाशिक पॅरेंटस असोसिएशनने ढालीप्रमाणे या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना नाशिक जिल्ह्यात संरक्षण प्राप्त करून दिल्याने त्यांचा शाळा प्रवेश सुकर झाला आहे.
..असा आहे शासननिर्णय राज्यातील कोणत्याही प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात अन्य शाळांतून विद्यार्थी प्रवेश मागत असेल तर अशा विद्यार्थ्यांना टी.सी.अभावी प्रवेश नाकारण्यात येऊ नये. आरटीइ अधिनियमातील कलम ४ मध्ये शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गात प्रवेश देण्याचे नमूद आहे.
शिक्षण हक्कबाबत आग्रह शिक्षण हक्क कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करण्याबाबत आम्ही आग्रही आहोत. आर्थिक विवंचनेमुळे विद्यार्थी शाळाबाह्य होत असल्यास त्यास कायदेशीर मार्गाने शिक्षणात सामावून घेण्याची जबाबदारी शिक्षण विभागाचीच आहे. - नीलेश साळुंखे, अध्यक्ष, नाशिक पॅरेंटस असोसिएशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.