आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊन:उद्याने लॉकडाऊन, ठेकेदार अप; कागदावर फुलवली 10 कोटींची हिरवळ

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महापालिकेची उद्याने कोरोनाकाळात मार्च २०२० पासून बंदच होती. ती २६ एप्रिल २०२२ ला खुली करण्यात आली. मात्र याच काळात पालिकेच्या सहाही विभागांतील ३४१ उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीवर १० कोटी ४ लाख १२ हजार ६६९ रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उद्यान विभागाकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे शहरातील उद्याने पाहिली तर नक्की ही १० कोटींची उधळपट्टी झाली कुठे? असा प्रश्न ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समोर आला आहे. महापालिकेकडून ३४१ उद्यानांची देखभाल दुरुस्तीचे काम ठेकेदारास देण्यात आले आहे.

५ रुपये ६० पैसे प्रति चाैरस मीटरप्रमाणे देखभालीसाठी...
मिळालेल्या आकडेवारीतून उद्यान निरीक्षकांचे उद्यानांकडे दुर्लक्ष होत असल्याचे छायाचित्रांवरून उघड होत आहे. पालिकेने बिले काढण्यासाठी नियमावली दिली आहे. उद्यानांच्या आकारानुसार ५ रुपये ६० पैसे प्रति चौरस मीटर याप्रमाणे देखभालीसाठी उद्याने जातात. त्यासाठी १० ते २० हजारांपर्यंत दरमहा बिले काढली जातात. मात्र, ठेकेदार ४ ते ५ हजार रुपये रोजंदारीवर माणसे ठेवून पालिकेची लूट करत असल्याचा आरोप नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे.

मोजक्या उद्यानांतच गर्दी
शहरातील इंदिरानगर परिसरातील सिटी गार्डन, गंगापूर-नाक्यावरील प्रमोद महाजन उद्यानांची सध्या जरा बरी आहे. या उद्यानांमधील खेळण्या, प्राण्यांच्या प्रतिकृती, इतर सुविधा, विद्युत रोषणाई याकडे प्रभागातील नागरिक आणि लोकप्रतिनिधींचेही लक्ष असल्याने ही उद्याने नागरिक आणि चिमुकल्यांच्या किलबिलाटाने नेहमीच फुललेली असतात.

हवीतशी देखभाल न झालेल्या ठेकेदारांना दिल्या नाेटिसा
कोरोनाकाळातही महापालिकेकडून शहरातील उद्यानांची देखभाल दुरुस्ती सुरूच होती. शहरातील काही उद्यानांची हवी तशी देखभaाल ठेकेदारांकडून झालेली नाही अशा तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. तसेच, या ठेकेदारांकडून त्यांना दिलेली मुदत संपण्याच्या अगोदरच पुन्हा सर्व कामे पूर्ण करुन घेतली जाणार आहे.- विजयकुमार मुंडे, उपायुक्त (उद्यान) महापालिका

बातम्या आणखी आहेत...