आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या ताेट्यात दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. ताेटा कमी करण्यासाठी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात खासगी प्रवासी वाहतूकदारंानी वाहने उभी करू नये, असे आदेश काढले आहेत. मात्र एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा आदेश कागदापुरताच उरला आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून थेट बसस्थानकातून प्रवासी पळविले जात आहे. यावर दिव्य मराठीचा हा स्पाॅट रिपाेर्ट...
शहरातील नवीन बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, नाशिकराेड बसस्थानक येथून राज्याअंतर्गत विविध मार्गावर एसटी महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवासी वाहतूूक केली जात आहे. काेराेनामुळे शासनाच्या वतीने लावण्यात आलेले बंधने व त्यानंतर वेतनवाढीसंदर्भात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे एसटीच्या ताेट्यात माेठ्या प्रमाणावर वाढ झाली हाेती. वाढता ताेटा कमी करण्याबराेबरच अधिकाधिक प्रवासी एसटीकडे वळविण्यासासाठी महामंडळाच्याा वतीने विविध उपक्रम, याेजना राबविल्या जात आहे.
तसेच खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या मुजाेरीला आळा घालण्यास बसस्थानक परिसराबाहेरील परिसरात २०० मीटर अंतरावर काेणतीही खासगी प्रवासी वाहने उभी करू नये आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न झाल्याने संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहे. असे असताना काेणत्याही कारवाईची भीती न बाळगता तसेच अधिकाऱ्यांच्या कारवाईस न घाबरता बसस्थानकाबाहेर वाहने, बसेस उभ्या करत थेट बसस्थानकातून प्रवासी नेले जात असल्याची गंभीर बाब ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत समाेर आली आहे.
या प्रकारामुळे एस.टी.च्या ताेट्यात वाढ हाेण्याबराेबर प्रवाशांची सुरक्षिततादेखील धाेक्यात येत आहे. विशेष म्हणजे एस.टी. कर्मचाऱ्यंाच्या डाेळ्यासमाेर असे प्रकार हाेत असतानाही त्याविराेधात काेणत्याही प्रकारची कारवाई हाेत नसल्याने प्रवाशांकडूनदेखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दिवसेंदिवस याबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाहतूक काेंडीत पडतेय भर, अपघातास कारण : नवीन बसस्थानकासह मुंबईनाका परिसरात बसस्थानकाच्या बाहेर रस्त्यावर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेससह अन्य प्रवासी वाहने उभे रहात असतात. या प्रकारामुळे वाहतूक काेंडीत भर पडण्याबराेबर अपघातास देखील कारण ठरत आहे. या प्रकाराकडेही वाहतूक पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत आहे.
दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी : नियमाचे पालन न करणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूकदारावर अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. अशा अधिकाऱ्यांवरच सर्वप्रथम कारवाई झाली आहे.
अपघात झाल्यास काेणाला जबाबदार धरावे : नवीन बसस्थानकाबाहेरील रस्त्यावर खासगी बसेस उभी रहात असल्याने अपघात झाल्यास वाहतू्क काेंडी निर्माण हाेते. या प्रकारामुळे जर अपघात झाला तर काेणाला जबाबदार धरावे.
महामार्ग बसस्थानकात खासगी प्रवासी वाहतूकदांराचा मुक्त संचार
खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून काेणत्याही कारवाईची भीती न बाळगता महामार्ग बसस्थानक परिसरात मुक्त संचार करत प्रवासी पळविले जातात.या प्रकारामुुळे मात्र एसटीला महामंडळाला माेठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
एसटी महामंडळासह आरटीआेकडून कागदी घाेडे
बसस्थानकाच्या बाहेर खासगी प्रवासी वाहतूकदारांवर कारवाईबाबत एसटी महामंडळाच्या वतीने प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देण्यात आलेले आहे.मात्र या िवराेधात काेणत्याही प्रकारची ठाेस कारवाई हाेत नसल्याने एसटी महामंडळासह प्रादेशिक परिवहन िवभागाकडून कारवाईचे केवळ कागदीच घाेडे नाचविले जात असल्याचे समाेर आले आहे.
कारवाईबाबत आरटीओला पत्र दिले आहे
एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न केले जात आहेे. बसस्थानकच्या बाहेर उभ्या राहणाऱ्या खासगी प्रवासी वाहतूकदारांविराेधात कारवाईबाबत प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र दिले आहेत. त्यांच्याकडून कारवाई अपेक्षित आहे. अरुण सिया, वाहतूक नियंत्रक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.