आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्ट कार्यालयाचे सर्व्हर डाऊन; नागरिकांची गैरसाेय:नाशकात अनेकांना दिल्या आठवडाभरानंतरच्या तारखा

नाशिक7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील चार दिवसापासून पासपोर्ट ऑफिसचे सर्व्हर डाऊन असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. मगळवारी(दि.२२) सक‍ाळपासूनच सर्व्हर डाऊन झाल्याने पासपोर्ट कार्यालयातील सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.नागरिकांना सायंकाळपर्यंत सर्व्हर नीट होण्याची वाट बघावी लागली. त्यानंतर काही तासांनी सर्व्हर नीट झाल्यानंतर थोडावेळ पुन्हा सर्व्हर बंद पडले होते. सर्व्हर डाऊन असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे गोंधळ उडाला होता. तर,अनेकांना पुढील आठवड्याची व डिसेंबर महिन्याची अपॉइंटमेंट देण्यात आली. पासपोर्ट कार्यालयांकडून विविध कामांसाठी नागरिकांना अपॉइंटमेंट दिली जाते. त्याप्रमाणे मंगळवारी ज्या नागरिकांची अपॉइंटमेंट होती ते पासपोर्ट कार्यालयांमध्ये सकाळी ९ वाजताच पोहोचले होते. मात्र, या ठिकाणी ‘सर्व्हर डाऊन’ असल्यामुळे पासपोर्टशी संबंधित सर्व कामे ठप्प झाल्याचे सांगण्यात आले. यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. बाहेरगावहून आलेले अनेकांना तर दुपारनंतरही ‘सर्व्हर’ची समस्या जाणवल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. परदेशात जाण्यासाठी पासपाेर्ट आवश्यक असताे. नागरिकांना ताे सुलभपणे मिळावा यासाठी केंद्र शासनाने सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र,शहरातील नाशिकरोड येथील पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर डाऊन राहत असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांना खाली हात जावे लागत आहे. नाशिकसह औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक या कार्यालयात येतात. मात्र या कार्यालयातील सर्व्हर मागील शुक्रवारपासून दिवसभर डाऊन राहत असल्याने पासपोर्टसाठी मुलाखतीला आलेल्या नागरिकांना अक्षरश: कार्यालयाबाहेरील पायऱ्यांवर दिवसभर बसावे लागत आहे. मंगळवारी सर्व्हर डाऊन असल्यामुळे मुलाखती आणि कागदपत्र तपासणीसाठी आलेल्या शेकडो नागरिकांना माघारी फिरावे लागले.

सकाळपासून कार्यालयात गर्दी सकाळी ९ वाजल्यापासून दोनशेवर लोक पासपोर्ट काढण्यासाठी रांगा लावून उभे होते. मात्र, पासपोर्ट केंद्राचे सर्व्हर डाऊन झाल्याने कामाचा गोंधळ उडाला होता. दरम्यान सकाळपासून ही समस्या असतानाही बाहेर उपस्थित असणाऱ्या अनेक लोकांना त्याची कल्पना पासपोर्ट कार्यालयातर्फे देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकांना पासपोर्ट केंद्राबाहेर ताटकळत उभे राहावे लागले.

अनेकांना सायंकाळी नवीन अपॉइंटमेंटचे मेसेज नाशिकरोड येथिल पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर मंगळवारी सकाळपासूनच डाऊन झाले होते. त्यामुळे चार-पाच तास पासपोर्ट कार्यालयात गेलेल्या नागरिकांना वाट पाहावी लागली. सर्व्हर डाऊन असल्याचे कारण नागरिकांना सांगण्यात आले. यामुळे नागरिकांचा चांगलाच संताप झाला. सर्व्हर डाऊन होता मग बोलावलेच कशासाठी, असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. तर,अनेकांना पुढील आठवड्यांचे तारखा देण्यात आल्याचे मेसेज सायंकाळी मिळाले.

अशी आहे आकडेवारी { ८४०० नागरिकांची महिन्याभरात अपाइंटमेंट { २८० नागरिकांना पासपोर्ट कार्यालयातून दररोज दिली जाते अपाइंटमेंट { १४ स्लॉटच्या माध्यमातून अपाइंटमेंट { २ टेबल अर्ज जमा करण्यासाठी { १ A1 फोटोग्राफ व स्वाक्षरी टेबल { २ B1,B2 टेबल { १ एटीऒ अधिकारी

बातम्या आणखी आहेत...