आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल निवडणूक:पाेस्टाने आलेल्या मतपत्रिका मेडिकल स्टाेअर्समध्ये लपवल्या; सिन्नर पोलिसांनी केली पोलखोल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल पदाधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणूकीसाठी पाेस्टाने पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिका चक्क सिन्नर मधील दाेन मेडिकल स्टाेअर्स मध्ये लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. यानंतर सिन्नर पोलिसांनी या मेडीकलवर छापा घालुन मतपत्रिका जप्त केल्या.

मध्य महाराष्ट्राचे उमेदवार धनंजय खाडगीर यांच्या तक्रारीवरून सिन्नर पाेलिसांनी दाेन्ही ठिकाणी छापे टाकून मतपत्रिका ताब्यात घेतल्या आहेत. पाेलिसांनी याबाबतचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलची निवडणूक प्रक्रिया 20 फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. या निवडणूकीसाठी राज्यभरातून 35 उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. यासाठी राज्यातून 2 लाख 85 हजार मतदार बॅलेटपेपरद्वारे मतदान करत आहेत.

एका मतदाराला 6 उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार आहे. फार्मसी कौन्सिलद्वारे मतदारांना पोस्टाद्वारे बॅलेट पेपर पोहोच केले जात असून 23 मे ते 17 जुनपर्यंत मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. दरम्यान पोस्ट ऑफिसमधून प्रतिस्पर्धी उमेदवार मतदारांचे बॅलेट पेपर परस्पर गायब करत असल्याचा प्रकार गुरुवारी रात्री मध्य महाराष्ट्राचे उमेदवार धनंजय खाडगीर यांनी उघडकीस आणला आहे.

यानंतर सिन्नर पोलिसांनी छापा टाकून सिन्नर येथील मेडिलाईन एजन्सी मध्ये 44 बॅलेट पेपर तर शिवकृपा मेडिकल मधून 25 बॅलेट पेपर हस्तगत केले. असाच प्रकार संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु असल्याचा आरोप मध्य महाराष्ट्राचे उमेदवार धनंजय खाडगीर यांनी केला आहे. बहुतांश मतदारापर्यंत मतपत्रिकाच पोहचत नसल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागत असल्याचा आराेप खाडगीर यांनी केला आहे. याबाबत मुंबईस्थित (मुलुंड) निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

लोकशाहीला काळिमा फासण्याचा प्रकार

मध्य महाराष्ट्राचे उमेदवार धनंजय खाडगीर म्हणाले, एकीकडे देशभरात ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेत पारदर्शकता आणल्याचे बोलले जात आहे तर दुसरीकडे मात्र या अत्याधुनिक युगात अश्या प्रकारे जुन्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवत बोगस मतदानाला खतपाणी घातले जात आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार मतपत्रिकेचे गठ्ठे गायब करत बोगस मतदान करीत असून हा लोकशाहीला काळिमा फासण्याचा प्रकार आहे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवला अहवाल

पोलिस निरीक्षक सिन्नरचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या निवडणूकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराने आमच्याकडे तक्रार केली. त्यानुसार सिन्नर मधील दाेन मेडिकल स्टाेअर्स मध्ये आम्ही छापा टाकला असता तेथे काही मतपत्रिका आढळल्या. यासंदर्भातील अहवाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...