आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युजरकडून खोडसळपणा:सचिन पिळगावकरांवरील पाेस्टने चाहत्यांना धक्का

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांच्यावरील एक पाेस्ट गुरुवारी सायंकाळी (ता. 2) साेशल मीडियात व्हायरल झाल्याने मराठी रसिक आणि सचिन यांच्या चाहत्यांना धक्का बसला.

मराठी रसिकांच्या मनामनात घर केलेल्या सचिन पिळगावकर यांच्या निधनाची ती पाेस्ट साेशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. यामुळे ही पाेस्ट खरी आहे का? असे खरेच झाले का? झाले असेल तर धक्कादायक आहे अशा त्यावर कमेंटही आल्या. मात्र त्यानंतर अनेकांनी ही घटना खराेखरीच घडली आहे का? याची खात्री करण्याचाही प्रयत्न केला. पोस्ट करणाऱ्यावर अनेकांनी आगपाखड केली. काेणतीही अनुचित घटना घडलेली नसल्याची नेटकऱ्यांनी खात्री केल्यानंतर सुटकेचा निःश्वास सोडला.

अशी आहे फेसबुकवर पाेस्ट

फेसबुकवर एका युझरने सचिन यांचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फाेटाे टाकत त्याच्या काेपऱ्यावर शाॅकिंग न्यूज असे टॅग केले आहे. तर त्या फाेटाेवर ‘legendary actor & directore Mr. sachin Pilgaonkar passed the vashi toll naka few minutes back’ याचा अर्थ अनेकांनी passed away असा घेतल्याने साेशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली हाेती.

बातम्या आणखी आहेत...