आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Path To Competitive Exam Success For Government Jobs; Communication By Prof. Rahul Shinde At Venkatarao Hare College Of Arts, Science And Commerce| Mararthi News

दिव्य मराठी विशेष:शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा यशाचा मार्ग; व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्रा.राहुल शिंदे यांचा संवाद

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगाची वाटचाल स्पर्धात्मक आहे. सारं जग स्पर्धेच्या लयीने एकमेकांसोबत चाललेले आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकांशी स्पर्धा करण्यासाठी धजावलेला आहे जणू काही स्पर्धा परीक्षा हाच त्यांचा जीवनाचा मार्ग आहे की काय असे वाटायला लागले आहे. स्पर्धा परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. शासकीय नोकरीतील यशाचा मार्ग म्हणून तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा, असे मार्गदर्शन प्रा.राहुल शिंदे यांनी “स्पर्धा परीक्षा शासकीय नोकरीतील यशाचा राजमार्ग” या विषयावर बाेलताना केले.

लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि युनिव्हर्सल अॅकॅडमी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने व प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या मार्गदर्शनखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रा.राहुल शिंदे यांनी यावेळी अापले विचार मांडले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एच.कापडणीस होते. स्पर्धा करीत असताना सामाजिक हिताचा देखील विचार करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे हे अंतिम ध्येय न मानता ते सामाजिक सेवेचे साधन मानले पाहिजे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास सुरू ठेवावा. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यास परीक्षेत लवकर यश मिळवता येईल, असे प्रा.शिंदे म्हणाले.

कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे एच. आर. सुपरवायझर डॉ. विनीत रकिबे, विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. राकेश पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. एम. पी. पगार, गणित विभागाचे प्रमुख डॉ. मांजरेकर, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. सूचिता सोनवणे, प्रा. भदाणे सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भदाणे सर यांनी केले तर प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा प्रमुख डॉ. राजाराम जाधव यांनी केले तर आभार प्रा. स्वप्निल धात्रक यांनी मानले.

शिक्षक, प्रशासक समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे घटक
उपप्राचार्य प्रा. डॉ. के. एच. कापडणीस म्हणाले की, समाज जीवनाच्या जडणघडणीत शिक्षक, प्रशासक व लोकप्रतिनिधी हे मानवी समाज परिवर्तनाचे तीन महत्त्वाचे घटक आहेत. सामाजिक बदल हा स्पर्धतूनच घडत असतो. स्पर्धा परीक्षा या देखील सामाजिक बदलाच्या रूपरेशा आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उत्कृष्ट व्यक्तीची निवड करून समाज सेवेचे कार्य घडवून आणल्या जाते. स्पर्धा ही शासकीय व निमशासकीय नोकरीसाठी घेतली जाते. जो या स्पर्धा परीक्षेत यश मिळवितो तोच सरकारी नोकरीसाठी पात्र ठरत असतो. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर अभ्यासाच्या दृष्टीने खूप प्रयत्न करावा लागतो. माेबाइलमध्ये वेळ न घालवता तरुणांनी स्पर्धा परीक्षांसाठी अवांतर ज्ञान वाढवावे.

बातम्या आणखी आहेत...