आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:चेतना के स्वर मध्ये देशभक्तीचा जागर, 300 विद्यार्थ्यांचा सहभाग; भारत विकास परिषद नाशिक मिडटाऊनतर्फे आयाेजन

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्कृत व हिंदीमध्ये लयबद्ध सुरात राष्ट्रगीताच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा जागर केला, निमित्त हाेते भारत विकास परिषद नाशिक मिडटाऊनच्या वतीने आयाेजित हिंदी व संस्कृत राष्ट्रगीत स्पर्धेचे. या स्पर्धेत २४ शाळांतील ३०० विद्यार्थी सहभागी झाले हाेते.विद्यार्थ्यामध्ये देशभक्तीची बीजे रुजावी या उद्देशाने दरवर्षी भारत विकास परिषद नाशिक मिडटाऊनच्या वतीने हिंदी व संस्कृत राष्ट्रगीत स्पर्धा घेण्यात येते. यंदाही ही स्पर्धा गंगापूरराेडवरील कुर्तकाेटी हाॅलमध्ये रंगली.

प्रारंभी रेवती कुलकर्णी यांनी ‘वंदे मातरम‌्’चे गायन केले. यानंतर प्रसिद्ध गायक श्रीराम तत्त्ववादी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. सहावी ते बारावी अशा गटांमध्ये स्पर्धा रंगली. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संस्कृत व हिंदी भाषेत केलेल्या सुरेल आवाजातील राष्ट्रगीत गायनाने उपस्थितांना माेहिनी घातली.

स्पर्धेत एकूण ४० गाणी सादर झाली. यानंतर उमेश राठी यांनी संस्थेचे कार्य व उद्देश याबद्दल माहिती दिली. प्रसिद्ध गायिका नीला देशपांडे यांच्या हस्ते पारिताेषिकांचे वितरण झाले. संस्थेच्या संचालिका हर्षा वैद्य व अपर्णा राठी यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देशपांडे, खजिनदार सुरेश पाटील, कार्यकारिणी सदस्य सरिता काळविट, स्व्रधुनी विप्र, सुहास वैद्य, मनाेहर पगारे, दीपक काळविट, प्रदीप गाडगीळ आदी उपस्थित हाेते. उमेश सोनवणे यांनी आभार मानले.

काेलंबियाच्या नागरिकांची विशेष उपस्थिती
काेलंबिया येथून आलेल्या नागरिकांचीदेखील या कार्यक्रमास उपस्थिती हाेती. शालेय विद्यार्थ्यांच्या गायनासह या उपक्रमाचे त्यंानी विशेष काैतुक करण्यात आले. या विदेशी पाहुण्यांच्याही हस्ते पारिताेषिके वितरीत करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...