आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:मराठवाडा, नाशिकसाठी लाभदायी किकवी पेयजल प्रकल्पाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक व मराठवाड्याचा पाणीप्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या गंगापूर धरणाजवळील किकवी पेयजल प्रकल्प तसेच ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी,आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, पार गोदावरी उपसा जोड योजना मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या सर्व प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन ही कामे तत्काळ मार्गी लावणार असल्याचे स्पष्ट केले. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ या वेळी उपस्थित होते.

या योजनांचे प्रस्ताव राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नियोजन विभाग अशा वेगवेगळ्या पातळीवर प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामधील त्रुटी दूर करून ही कामे मंजूर करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून एक उच्चस्तरीय बैठक घेऊन कारवाई करावी असे आदेश जयंत पाटील यांनी दिले. या बैठकीला जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, लाभक्षेत्र विकास सचिव किरण कुलकर्णी, सहसचिव अतुल कपोते, अहमदनगरचे अधिक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता संगीता जगताप उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...