आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीनंतर बुस्टर:मविप्रला पवारांचे अर्थबळ, राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून संस्थेला एक काेटी देणगी

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मविप्र संस्थेवर ६० काेटींचे कर्ज व ७० काेटींची इतर देणी असे १३० काेटींचे दायित्व असल्याची माहिती नवनिर्वाचित संचालकांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिली. हे एेकून चिंतित झालेल्या पवारांनी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने एक काेटीची देणगी जाहीर केली. तसेच संस्थेचे दायित्व कमी करण्यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अापापल्या रकमा संस्थेकडे जमा करण्याचे अावाहन केले.

संस्थेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नितीन ठाकरे यांच्या परिवर्तन पॅनलनचा एकतर्फी विजय झाला. त्यामागे शरद पवारांचा ‘अदृश्य हात’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित संचालकांनी रविवारी (दि.४) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पवार यांची भेट घेतली. यावेळी संस्थेला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याच्या सूचना पवारांनी दिल्या. छगन भुजबळ, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे यांनी प्रत्येकी ५-५ लाखांची तर देविदास पिंगळे, संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्यासह इतर विश्वस्तांनी प्रत्येकी लाख-लाख रुपयांची देणगी जाहीर केल्याने संस्थेला दीड कोटी मिळाले. समाजाकडून देणग्या गोळा करून कर्ज कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करतानाच आपण संस्थेच्या पाठी खंबीर उभे राहणार असल्याचा विश्वास पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला.

१.३६ कोटींचा मिळाला निधी संस्थेच्या विकास व आर्थिक सक्षमतेसाठी शरद पवार यांनी खंबीरपणे पाठीशी राहणार असल्याची ग्वाही दिल्याने त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. त्यांनी केलेल्या अावाहनानुसार माझ्यासह सर्वच संचालक व पदाधिकाऱ्यांनी वैयक्तिक निधी जाहीर केल्याने संस्थेला एक काेटी ३६ लाख रुपये मिळाले अाहेत. -अॅड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र

मविप्रच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...